शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

मुळशीतील सातव खून प्रकरणातील आरोपी अखेर जेरबंद; दोन वर्षांपासून होता फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 11:12 IST

ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने औरंगाबाद येथून अटक केली आहे

ठळक मुद्दे २०१९ मध्ये दसऱ्याच्या दिवशी मुळशीतील लवळे येथे प्रतीक सातव याची पाच ते सहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली होती

पौड: सातव खून प्रकरणातील फरार आरोपी सूरज सुतार याला ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने औरंगाबाद येथून अटक केली आहे. २०१९ मध्ये दसऱ्याच्या दिवशी मुळशीतील लवळे येथे प्रतीक सातव याची पाच ते सहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर बाकी आरोपीना अटक करण्यात आली होती. मात्र गुन्हा घडल्यापासून यातील सुरज राजाराम सुतार (वय ३० वर्ष रा. सुतारवाडी पाषाण) हा फरार होता.
 
पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण डॉ अभिनव देशमुख यांनी त्याचा शोध घेण्याच्या उद्देशाने दहशतवाद विरोधी कक्ष पुणे ग्रामीण पथकाला आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस पथकाने माहिती काढून सुतार याला सिल्लोड औरंगाबाद येथे जाऊन ताब्यात घेतले आहे.  व पुढील कारवाईसाठी पौड पोलीस स्टेशन यांना सुपूर्द केले आहे. सुरज सुतार हा सराईत आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे.

सुरज सुतार याला दोन वर्षांनी पकडण्यात पोलिसांना यश

मुळशीतील लवळे येथे राऊतवाडी ते भरे गावच्या दरम्यान सातव , कळमकरवस्ती आहे. या रस्त्याने प्रतिक व त्याचे अन्य दोन मिञ नवीन गाडी घेऊन सातवमळा (सावतामाळी मंदीर) परिसरात राहत्या घरी जात होते. येथील एका पोल्ट्री फार्मलगतच्या रस्त्यावर मारेकरी आरोपींनी गाडीला ट्रॅक्टर आडवा घालून प्रतिकला बाहेर ओढले आणि त्याच्यावर कोयता तसेच तलवारींनी सपासप वार केले. त्यात प्रतिकचा जागीच मृत्यू झाला होता. १९ ऑक्टोबर २०१९ ला हि घटना घडली होती. त्यानंतर आरोपीना तातडीने अटक करण्यात आली. पण त्यांच्यापैकी एक सुरज सुतार तेव्हापासून फरार होता. त्याला दोन वर्षांनी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेpirangutपिरंगुटCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक