शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेच्या बैठकीला जाताना अपघात; पुण्यात ‘बीएलओ’ प्राध्यापकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 13:42 IST

धानोरी-लोहगाव रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरली, या अपघातात प्राध्यापकाच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला

लोहगाव : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 'मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण' (एसआयआर) मोहिमेच्या तातडीने बोलावलेल्या बैठकीला जात असताना, लोहगाव येथे एका ४० वर्षीय प्राध्यापकाचा दुर्दैवी अपघातीमृत्यू झाला. ज्ञानेश्वर रोटे असे या प्राध्यापकाचे नाव आहे. कामाच्या प्रचंड तणावामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे (रा. रोटेवाडी, अहिल्यानगर) हे वडगाव शेरी मतदारसंघात 'बीएलओ' म्हणून कार्यरत होते. सोमवारी (१३ एप्रिल) दुपारी साडेबाराच्या सुमारास उपजिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीसाठी ते दुचाकीवरून निघाले होते. धानोरी-लोहगाव रस्त्यावरील स्पार्क स्प्रिंग सोसायटीसमोर त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. एका स्थानिक तरुणाने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कौटुंबिक पार्श्वभूमी

प्राध्यापक रोटे हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील असून, त्यांची अलीकडेच इंदापूर तालुक्यातील कळंब येथून लोहगाव येथे बदली झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, ११ वर्षांची मुलगी आणि ६ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. लोहगाव पोलिसांनी सध्या या घटनेची 'आकस्मिक मृत्यू' म्हणून नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Professor Dies in Accident Enroute to Election Duty Meeting

Web Summary : A professor died in Lohgaon, Pune, while heading to an election duty meeting. Gyaneshwar Rote, a BLO, was fatally injured in a road accident. Teacher organizations allege work pressure caused the tragic incident. He leaves behind his wife and two children.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातLohgaonलोहगावPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकDeathमृत्यूbikeबाईक