Join us
Daily Top 2Weekly Top 5

नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....

नूरनं तीन विकेट्स घेत फिरवली मॅच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 00:53 IST

Open in App

Noor Ahmad Brings In A New Celebration :चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने घरच्या मैदानातील पराभवाची मालिका खंडीत केल्यावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यातही  तोच रुबाब कायम ठेवला. धावांचा बचाव करणं आव्हानात्मक असताना चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली. त्यात नूर अहमद सर्वात आघाडीवर राहिला. त्याने कर्णधार अजिंक्य रहाणेसह KKR चा सर्वात महागडा खेळाडू असलेल्या कॅमरून ग्रीनला खातेही न उघडता आल्या पावली माघारी धाडले. या दोघांशिवाय त्याने उप कर्णधार रिंकूलाही स्वस्तात तंबूचा रस्ता धाकवला. त्याच्या या कामगिरीसह बॅक टू बॅक विकेट घेतल्यावर त्याने अनोख्या अंदाजात केलेल सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

चर्चा अनोख्या सेलिब्रेशनची 

कोलकाता नाईट रायडर्सच्या डावातील ११ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर नूर अहमद याने अजिंक्य रहाणेच्या रुपात विकेटच खाते उघडले. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या कॅमरून ग्रीनला त्याने पुढच्या चेंडूवर बाद केले. या दोन विकेट्स मिळवल्यावर डोळ्यांवर हात ठेवून त्याने अनोख्या अंदाजात विकेट्स मिळवल्याचा आनंद साजरा केला. कामगिरीशिवाय त्याचा अनोखा अंदाज लक्षवेधी ठरला. 

IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच

नूरनं तीन विकेट्स घेत फिरवली मॅच

गत हंगामात चेन्नई  सुपर किंग्सचा संघ तळाला राहिला, पण नूर अहमद हा सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होता. यंदाच्या हंगामात पहिल्या काही सामन्यात तो संघर्ष करताना दिसला. परिणामी संघालाही फटका बसला. पण तो आता त्याने दमदार कमबॅक केले आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ४ षटकांत केवळ २१ धावा खर्च करत ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेत सामन्याला कलाटणी दिली. उर्वरित सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Noor's celebration! Dismissed Rahane, expensive Green cheaply in IPL.

Web Summary : Noor Ahmad's exceptional bowling helped Chennai Super Kings defeat Kolkata Knight Riders. He dismissed Ajinkya Rahane and Cameron Green for ducks, also taking Rinku Singh's wicket. His unique celebration after taking wickets became a talking point during the match. He took 3 wickets for just 21 runs.
टॅग्स :आयपीएल २०२६कोलकाता नाईट रायडर्सचेन्नई सुपर किंग्सअजिंक्य रहाणे