शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकरांसारख्या कर्तव्यदक्ष निष्पक्ष व्यक्तीची नियुक्ती करावी - रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 16:18 IST

‘बाल हक्क आयोगाने या घटनेची दखल घेतली आहे, मात्र महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असतानाही आयोगाने कोणतीही हालचाल केलेली नाही

धायरी : अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या कुटुंबीयांची धायरी येथे आज आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांनी आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, अशी आग्रही मागणी केली. विशेष म्हणजे, कुटुंबीयांनी कोणत्याही आर्थिक मदतीची अपेक्षा न ठेवता, फक्त कठोर न्यायाचा आग्रह धरला आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी महिला आयोगाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘बाल हक्क आयोगाने या घटनेची दखल घेतली आहे. मात्र, महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असतानाही आयोगाने कोणतीही हालचाल केलेली नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकर यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष आणि निष्पक्ष व्यक्तीची नियुक्ती करावी, तिथे कोणताही राजकीय व्यक्ती नको,’ अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री यांनी हे प्रकरण १४ दिवसांत निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे. याचे स्वागत करत असतानाच, रोहित पवार यांनी ''शक्ती कायद्या''च्या तातडीच्या अंमलबजावणीवर भर दिला. हा कायदा लागू करण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. या निर्णयाला विरोधक म्हणून आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. घटनेमुळे जनमानसात तीव्र संताप असून, जनता अत्यंत भावनिक असल्याने सरकारने तातडीने योग्य कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

नवले पुलाजवळ लाठीचार्ज निषेधार्ह; रोहित पवार संतापले

नवले पुलाजवळील आंदोलन पूर्णपणे सर्वसामान्य नागरिकांचे होते, त्यात कोणताही राजकीय पक्ष सहभागी नव्हता. तिथे पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा रोहित पवार यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. "लाठी मारायचीच असेल तर आमच्यासारख्या राजकीय नेत्यांवर मारा, सर्वसामान्यांवर अत्याचार करू नका," असे ते म्हणाले. पीडित कुटुंबीयांच्या भेटीबाबत त्यांनी स्पष्ट केले की, त्यांची इच्छा माहीत असती तर मी येणे टाळले असते, पण त्यांच्या मागण्या रास्त असल्याने मी त्यांच्या भूमिकेचे पूर्ण समर्थन करतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Appoint Meera Borwankar to Women's Commission: Rohit Pawar Demands

Web Summary : Rohit Pawar urges appointing Meera Borwankar to the Women's Commission, citing its inactivity. He supports swift implementation of the 'Shakti Act' and condemns the police's excessive force on civilians during a protest.
टॅग्स :PuneपुणेRohit Pawarरोहित पवारPoliceपोलिसPoliticsराजकारणCourtन्यायालयstate women commissionमहाराष्ट्र राज्य महिला आयोगWomenमहिला