येरवडा मनोरुग्णालयातील रुग्णाने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 16:38 IST2026-05-13T16:38:06+5:302026-05-13T16:38:23+5:30

रुग्णालयातील बॅरेक नंबर एकमधील रूम नंबर चारमध्ये मनोरुग्णाने खिडकीला त्याच्या पँटच्या साहाय्याने गळफास घेते आत्महत्या केली आहे

A patient at Yerwada Psychiatric Hospital took an extreme step. | येरवडा मनोरुग्णालयातील रुग्णाने उचलले टोकाचे पाऊल

येरवडा मनोरुग्णालयातील रुग्णाने उचलले टोकाचे पाऊल

पुणे : येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील एका रुग्णाने खिडकीला पँटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सनी मोहन सोनवणे (वय २९, रा. सोपन काका बिल्डिंग, वसंत नगर, बारामती) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी रोड मार्शल यांना मनोरुग्णालय येथे रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा कॉल प्राप्त होता. त्याअनुषंगाने मार्केट विश्रांतवाडी पुणे या ठिकाणी पोलिस उपनिरीक्षक कदम, कर्मचारी, आळंदी रोड मार्शलवरील पोलिस गायकवाड व पोलिस शिपाई राजपूत हे त्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा रुग्णालयातील बॅरेक नंबर एकमधील रूम नंबर चारमध्ये मनोरुग्णाने खिडकीला त्याच्या पँटच्या साहाय्याने गळफास केल्याचे दिसले रुग्णाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता ससून रुग्णालय येथे पाठविण्यात आलेला आहे. त्याचे शवविच्छेदन बुधवारी (दि. १३) होणार आहे.

Web Title : येरवडा मनोरोग अस्पताल में मरीज ने की आत्महत्या; उठाया कठोर कदम

Web Summary : पुणे के येरवड़ा मनोरोग अस्पताल में एक 29 वर्षीय मरीज ने अपनी पैंट का उपयोग करके खिड़की से फांसी लगाकर आत्महत्या कर ली। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Yerwada Mental Hospital Patient Dies by Suicide; Took Extreme Step

Web Summary : A 29-year-old patient at Yerwada Mental Hospital in Pune committed suicide by hanging himself from a window using his pants. Police are investigating.