शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

आठ जागांसाठी २३ नगरसेवक रिंगणात

By admin | Updated: September 29, 2014 05:41 IST

आघाडीत बिघाडी आणि महायुतीत काडीमोड झाल्याने शहरात सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढणार आहेत

पुणे : आघाडीत बिघाडी आणि महायुतीत काडीमोड झाल्याने शहरात सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढणार आहेत. त्यामुळे ऐन वेळी उमेदवारीसाठी राजकीय पक्षांची धावाधाव झाली असली, तरी या आठ जागांवर वर्णी लावण्यासाठी महापालिकेच्या तब्बल २३ नगरसेवकांची लॉटरी लागली आहे. त्यात काही बंडखोर नगरसेवकांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत अशा प्रकरे एवढ्या मोठ्या प्रमाणात संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.गेली २५ वर्षे असलेली शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती आणि गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचे सूत न जुळल्याने हे चारही पक्ष एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. मात्र, या युती आणि आघाडीमुळे ज्या पक्षांकडे शहरातील आठ मतदारासंघांमध्ये जे मतदारसंघ आपल्या मित्रपक्षांकडे, त्या मतदारसंघामध्ये या चारही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कधीच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील आठ मतदारसंघांमध्ये सुमारे २३ नगरसेवकांचे अर्ज आहेत. त्यात प्रमुख पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या नगरसेवकांसह बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांचाही समावेश आहे. शहरात उमेदवारी देण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये सर्वाधिक प्रत्येकी ६ नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसने आणि मनसेने संधी दिलेली आहे, त्या खालोखाल भारतीय जनता पक्षाने ३, शिवसेनेने २, तर काँग्रेसने एका उमेदवारास संधी दिलेली आहे. तर पाच नगरसेवक पक्षाकडून विद्यमान आमदारांविरोधात संधी न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत. तर तीन माजी नगरसेवकही शहरतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (प्रतिनिधी)