१ बिबट्या, १३ लांडगे, ६ कोल्हे, ३० मोर; पुणे वनविभागांतर्गत झालेल्या प्राणीगणनेत दिसले अनेक वन्यजीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 15:00 IST2026-05-06T14:59:15+5:302026-05-06T15:00:28+5:30

प्राणीगणनेमध्ये पुणे वन विभागातील एकूण १२ वनपरीक्षेत्रांतील ८९ मचाणांवरून निरीक्षण करण्यात आले

1 leopard, 13 wolves, 6 foxes, 30 peacocks; Many animals were seen in the animal census conducted under the Pune Forest Department | १ बिबट्या, १३ लांडगे, ६ कोल्हे, ३० मोर; पुणे वनविभागांतर्गत झालेल्या प्राणीगणनेत दिसले अनेक वन्यजीव

१ बिबट्या, १३ लांडगे, ६ कोल्हे, ३० मोर; पुणे वनविभागांतर्गत झालेल्या प्राणीगणनेत दिसले अनेक वन्यजीव

पुणे : पुणेवनविभागांतर्गत बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने १ मे रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून ते २ मे रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत “मचाण पाणवठा प्राणी गणना” हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. वन्यजीव त्यांच्या नैसर्गिक अधिवासात अनुभवण्याची संधी देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने “निसर्गानुभव” ठरला. यामध्ये कोल्हा, तरस, लांडगे, मोर आणि एका ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले.

या प्रगणनेमध्ये पुणे वन विभागातील एकूण १२ वनपरीक्षेत्रांतील ८९ मचाणांवरून निरीक्षण करण्यात आले. या कालावधीत विविध वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर आढळून आले असून, विभागातील जैवविविधतेची समृद्धता अधोरेखित झाली आहे. दौंड व इंदापूर वनपरिक्षेत्रात प्रामुख्याने अनुसूची-१ मधील महत्त्वाचे वन्यप्राणी जसे लांडगा, चिंकारा व तरस आढळून आले. मावळ तालुक्यातील वडगाव, शिरोता व पौड वनपरिक्षेत्रांमध्ये सांबर हरिण व तरस यांचे निरीक्षण करण्यात आले. भोर तालुक्यातील नसरापूर व वेल्हे परिसरातील एका पाणवठ्यावर बिबट्याचे दर्शन झाले. तसेच पुणे शहरालगतच्या पुणे व भांबुर्डा परिसरातील पाणवठ्यांवर सांबर, तरस, रानडुक्कर व हनुमान लंगूर आढळून आले. ही संपूर्ण प्राणी गणना वन विभागातील वनरक्षक व वनमजूर यांनी पार पाडली.

मचाण पाणवठा प्राणी गणना ही केवळ आकडेवारी संकलनापुरती मर्यादित नसून, वन्यजीवांच्या नैसर्गिक वर्तनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची एक महत्त्वपूर्ण संधी आहे. या माध्यमातून मिळणारी माहिती पुढील संवर्धन व व्यवस्थापन निर्णयासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. वन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत समर्पणाने ही जबाबदारी पार पाडली, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. - महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग

वन्यजीव दिसल्याची आकडेवारी 

वन विभाग : पुणे
वन परिक्षेत्र : १२

मचाण संख्या : ८९
सहभागी लोक : २५४

दिसलेले वन्यजीव : ४२३

कोणते प्राणी दिसले ?

बिबट १, लांडगा १३, कोल्हा ६, चिंकारा १४९, तरस २१, भेकर २७, सांबर ३०, रानडुक्कर ३०, साळींदर ६, मोर ३० .

Web Title : पुणे वन विभाग गणना: तेंदुए, भेड़िये, लोमड़ी सहित कई वन्यजीव दिखे

Web Summary : पुणे वन विभाग की गणना में तेंदुए, भेड़िये, लोमड़ी, हिरण और मोर सहित विभिन्न वन्यजीव दर्ज किए गए। 89 स्थानों पर आयोजित इस पहल से क्षेत्र की समृद्ध जैव विविधता का पता चलता है और भविष्य के संरक्षण प्रयासों में मदद मिलती है।

Web Title : Pune Forest Census Reveals Diverse Wildlife: Leopards, Wolves, Foxes Spotted

Web Summary : Pune's forest census recorded diverse wildlife including leopards, wolves, foxes, deer, and peacocks. Conducted across 89 locations, the initiative highlights the region's rich biodiversity and aids future conservation efforts, according to forest officials.