शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेत आणून महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देणार: नाना पटोले

By मोरेश्वर येरम | Updated: January 22, 2021 16:35 IST

महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याची सुत्रांची माहिती.

राज्यात काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. पण यासाठी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर पटोले यांनी एक मोठं विधान देखील केलं आहे. 

"राज्यात स्वबळावर काँग्रेस पक्ष सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करत राहणार आहे", असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी 'या' नावावर शिक्कामोर्तब?; लवकरच करणार अधिकृत घोषणा

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यापाठोपाठ राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या होत्या. यासाठी नाना पटोले, काँग्रेस नेते राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांची नावं चर्चेत आहेत. यात नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबत खुद्द नाना पटोले यांना विचारण्यात आलं असता त्यांनी पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यास तत्पर असल्याचं म्हटलं. 

पालिका निवडणुकीत भाजपला जागा कळेल, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा 

"आमच्या पक्षामध्ये संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहे. जी जबाबदारी मला मिळेल ती प्रमाणिकपणे पार पाडण्याची तयारी माझी असून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. स्वबळावर महाराष्ट्रात पक्ष सत्तेत कसा येईल आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राला पुन्हा वैभव प्राप्त करुन देण्याचं काम काँग्रेस पक्षाकडून केलं जाईल", असं नाना पटोले म्हणाले. 

नाना पटोलेंचं नाव हायकमांडकडून निश्चित?राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीव सातव, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची नावं आघाडीवर आहेत. पण यातून नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या निवडीमुळे विधानसभा अध्यक्ष बदलाचा प्रश्न आहे. त्याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतची चर्चा केल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, नाना पटोले यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याने आता महाराष्ट्रात विधानसभेचा नवा अध्यक्ष देखील बदलावा लागणार आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून कोणाची निवड होणार याचीही चर्चा सुरू झाली आहे.  

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात