शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: "मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 10:31 IST

फडणवीसांवर टीका करताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं बेताल वक्तव्य

बुलडाणा: देशातील कोरोना रुग्णांचा दिवसागणिक वाढत असताना, आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण असताना दुसऱ्या बाजूला राजकारण जोरात सुरू आहे. राज्यातील रेमडेसिविरच्या तुटवड्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात जोरदार जुंपली आहे. काल रात्री हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. आता यावरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानानं नवा वाद निर्माण होण्यची शक्यता आहे.दमणच्या फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात; फडणवीस, दरेकर पोहोचलेमहाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शन पुरवाल तर परवाना रद्द करू, अशी धमकी केंद्र सरकारनं रेमडेसिविर तयार करणाऱ्या कंपन्यांना दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला. यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. आरोप सिद्ध करा, अन्यथा माफी मागा, असं खुलं आव्हान भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मलिक यांना दिलं. यानंतर काल दमणमधील एका फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. याची माहिती समजताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रेमडेसिविरवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीए. शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. फडणवीस यांच्यावर टीका करताना गायकवाड यांनी पातळी सोडली. 'तुमच्या सरकारमुळे लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याचा घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो, त्याला समजतं की कोरोना काय आहे? मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते,' असं गायकवाड म्हणाले.“महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवाल तर परवाना रद्द करू”; मंत्री नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

रात्री पोलीस ठाण्यात हाय व्होल्टेड ड्रामादमणच्या ब्रुक फार्मा या कंपनीच्या मालकाने महाराष्ट्राला रेमडेसीवीर इंजेक्शन देण्यास पुढाकार घेतला होता. त्याला पोलिसांनी अचानक ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या कंपनीच्या मालकाला पार्लेच्या पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवण्यात आले होते. त्याला बीकेसी पोलीस ठाण्यात नेण्यात आले . यामुळे फडणवीस आणि दरेकर या पोलीस ठाण्याकडे निघाले. 

महत्वाचे म्हणजे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे अलीकडेच दमनला या कंपनीमध्ये गेले होते. तेथे त्यांनी रेमडेसीवीरची ५० हजार इंजेक्शने बुक केल्याचे सांगितले होते. प्रदेश भाजपतर्फे राज्य सरकारला ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स भेट देण्यात येणार होती. राज्यात या इंजेक्शनचा तुटवडा असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने भाजपने राज्य शासनाला मदतीचा हात पुढे केला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी सोमवारी दमणमधील ब्रुक फार्मा कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. त्यानंतर ५० हजार रेमडेसिविर खरेदी करण्याचे ठरले. दमणमधून ही इंजेक्शन्स आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी लागते. ती मंगळवारपर्यंत मिळणार आहे, असे लाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले होते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Gaikwadसंजय गायकवाडShiv Senaशिवसेनाcorona virusकोरोना वायरस बातम्या