शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

'मी पुन्हा येईन' म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीसांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील : नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 20:36 IST

नारायण राणेंच्या जोडीला आता फडणवीस आले आहेत आणि त्यांनाही मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडत आहेत, मलिक यांचा टोला

ठळक मुद्देनारायण राणेंच्या जोडीला आता फडणवीस आले आहेत, मलिकांचा टोलाफडणवीस यांचे 'मी पुन्हा येईन' ची स्वप्ने पूर्ण होणार नाही, मलिक यांचं वक्तव्य

'मी पुन्हा येईन' म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला. "आम्ही फासे फिरवणार आहोत असे भाजप नेते सांगत आहेत. कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही, असाही उपरोधिक टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. 

"गेले २२ वर्ष नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न बघत आहेत. परंतु फासा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत. त्यांनाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत. स्वप्न पाहणे हा त्यांचा अधिकार आहे आणि फडणवीस यांचे 'मी पुन्हा येईन' ची स्वप्ने पूर्ण होणार नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवताना सांगितले होते की सरकार पाच वर्षे नाही तर हे सरकार २५ वर्ष टिकणार आहे आणि तेच घडणार आहे," असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.पंतप्रधानांवरही निशाणा

यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. "मोदींना आजपर्यंत कळलंच नाही की शरद पवार या देशातील कृषी सुधार पक्षकार होते. तेव्हाही आणि आताही ते कुठेतरी एकमत तयार करण्याचा प्रयत्न करत होते आणि कृषीमंत्री असताना मॉडेल कायदा तयार करण्याची तयारी होती. आज जे तीन कायदे करण्यात आले. ते तिन्ही कायदे कॉनक्रस लिस्टमध्ये असताना केंद्रसरकारने मॉडेल कायदा केला नाही. राज्यसरकारांचे कायदे स्वतःकडे घेऊन कायदे पारित केले. कायदे जसेच्या तसे लागू करणे हे राज्यांवर बंधनकारक आहे. मला वाटतं हाच फरक मोदींना कळत नाही," अशी जोरदार टीका नवाब मलिक यांनी केली."आजचा कायदा आणि मॉडेल कायदा काय आहे यातील फरक मोदींनी समजून घ्यावा. अजून वेळ गेलेली नाही. सुधारणांच्या विरोधात राष्ट्रवादी किंवा कुठलाही पक्ष नाही पण एकमत निर्माण करणे. लोकांना विश्वासात घेणे व सध्याचे कायदे आहेत त्यात बदल करणे हे गरजेचे असताना अजून टण्याची भूमिका पंतप्रधान करत असतील किंवा सरकार करत असेल तर ते योग्य नाही असेही नवाब मलिक म्हणाले.नवीन सुधारणा करण्याबाबत कायदा तयार करायचा असेल तर सरकारने सर्व विरोधकांना बोलावून विश्वासात घेतलं पाहिजे," असंही मलिक म्हणाले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाnawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे Chief Ministerमुख्यमंत्री