Maharashtra Budget 2021: “राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे तिघाडी सरकारचा किमान समान फसवणूक कार्यक्रम”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 04:32 PM2021-03-08T16:32:51+5:302021-03-08T16:33:29+5:30

BJP MLA Ashish Shelar Reaction on Maharashtra Budget 2021: पेट्रोल डिझेल भाव कमी करु सांगितले त्याबद्दल कोणती घोषणा नाही. आँनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही नाही. अशा अपेक्षा भंग करणारा हा अर्थसंकल्प आहे असं त्यांनी सांगितले.

Maharashtra Budget 2021: "budget is the least equal fraud program of the governments Ashish Shelar | Maharashtra Budget 2021: “राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे तिघाडी सरकारचा किमान समान फसवणूक कार्यक्रम”

Maharashtra Budget 2021: “राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे तिघाडी सरकारचा किमान समान फसवणूक कार्यक्रम”

Next

मुंबई - आघाडी सरकारने सत्तेत येताना जी किमान समान आश्वासने दिली ती इतिहास जमा झाली आहेत. आजच्या अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासन पूर्तीचा कोणताही कार्यक्रम नाही. शेतकरी, कामगार, छोटे उद्योजक असे अनेक समाज घटक कोरोनामुळ अडचणीत आले त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची विशेष तरतूद नाही अशा शब्दात भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. (BJP MLA Ashish Shelar Target Mahavikas Aghadi Government over Budget 2021 by DCM Ajit Pawar)

आमदार आशिष शेलार म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने हे सरकार विसरले तसेच पहिल्या अधिवेशनात विधानभवनात ज्या बारा बलुतेदारांना आणून त्यांच्या सोबत फोटो काढले त्या बारा बलुतेदारांना कोविड काळात काही दिले नाहीच, आता अर्थसंकल्पात ही त्यांच्या वाट्याला काहीच आले नाही. १ रूपयात आरोग्य सेवा , ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ अशी अनेक आश्वासने हवेत विरली आहेत. वीज बिलात माफी नाही, पेट्रोल डिझेल भाव कमी करु सांगितले त्याबद्दल कोणती घोषणा नाही. आँनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही नाही. अशा अपेक्षा भंग करणारा हा अर्थसंकल्प आहे असं त्यांनी सांगितले.

थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना ३३ टक्के सूट, मार्च अखेरपर्यंत ५० टक्के भरणा केल्यास...

तसेच मुंबईतील भाजपा(BJP) सरकारच्या काळातील जुन्या प्रकल्पांची नावे फक्त वाचून दाखवली. केवळ अट्टाहासाने मुंबईकरांच्या माथी मारण्यात येणाऱ्या समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाचे ढोलमात्र जोरात वाजवण्यात आले. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या बजेटमधील प्रकल्प प्रथमच राज्याच्या अर्थसंकल्पात दाखवून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात आली आहे.मुख्यमंत्री मुंबईकरांसाठी काहीतरी देतील अशी अपेक्षा असलेल्या मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत असं सांगत शेलारांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर(Shivsena) निशाणा साधत राजकीय किमान समान फसवणूक करुन सत्तेत आलेल्या तिघाडी सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे जनतेची किमान समान फसवणूक कार्यक्रमच आहे असा टोला त्यांनी सरकारला लगावला.

अर्थसंकल्प राज्याचा की केवळ काही भागांपुरता?; फडणवीसांचा ठाकरे सरकारच्या बजेटवर निशाणा

निधी केंद्राचा अन् घोषणा राज्याची

केंद्राकडून आलेला निधी सांगायचा नाही. केवळ थकबाकी सांगायची. केंद्राच्या मदतीनं सुरू असलेल्या प्रकल्पांचा उल्लेख अर्थसंकल्पात करायचा. मात्र इतर वेळी केंद्रावर टीका करायची, हेच महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे. अर्थसंकल्पात याचाच प्रत्यय आला. महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे रडगाणं असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केली

Web Title: Maharashtra Budget 2021: "budget is the least equal fraud program of the governments Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.