"राहुल गांधी आणि कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 11:43 AM2020-12-07T11:43:49+5:302020-12-07T11:54:30+5:30

BJP And Congress Rahul Gandhi Over Farmers Protest : भाजपाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे.

farmers protest bjp leader satish punia slams ashok gehlot and rahul gandhi | "राहुल गांधी आणि कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही"

"राहुल गांधी आणि कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही"

Next

नवी दिल्ली - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाच्या समर्थनार्थ केलेल्या विधानावर भाजपाने पलटवार केला आहे. भाजपाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे.  राहुल गांधी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात आणि त्यांना तसेच अशोक यांना शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही असं राजस्थान भाजपा प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी म्हटलं आहे.

"मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आठ तारखेला होत असलेल्या शेतकऱ्यांच्या भारत बंदचे समर्थन केलं आहे. मात्र यावेळी भारत बंद नाही, तर भारत खुला होण्याची आवश्यकता आहे, असे पूनिया म्हणाले. जगात खुल्या मनाने, खुला भारत नवा भारत आणि प्रगतीच्या मार्गावर चालावा यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे. राहुल गांधी यांनी हे शेतकऱ्यांचे समर्थक असल्याचं म्हटलं आहे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार केल्याचं विधान गेहलोत यांनी केलं आहे."

"गेहलोत यांचे हे विधान निराधार आहे. राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंब पार्टटाईम राजकारण करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही शेतकऱ्यांचं काहीही पडलेलं नाही" असं भाजपाच्या सतीश पूनिया यांनी म्हटलं आहे. तसेच राजस्थानात शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जर काँग्रेसला खरंच शेतकऱ्यांबाबत तळमळ असेल तर त्यांनी प्रथम राजस्थानातील शेतकऱ्यांची दखल घ्यावी असं देखील म्हटलं आहे. 

"काँग्रेसला खरंच शेतकऱ्यांबाबत तळमळ असेल तर त्यांनी प्रथम राजस्थानातील शेतकऱ्यांची दखल घ्यावी"

राजस्थानातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार या प्रश्नाचं उत्तरही अशोक गेहलोत देत नाहीत. जर ते खरोखरच शेतकऱ्यांचे हितचिंतक असतील, तर त्यांनी राजस्थानातील शेतकऱ्यांची दखल घेतली पाहिजे पूनिया यांनी म्हटलं आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी किमान समर्थन मूल्य कायम ठेवण्याबाबत केंद्र सरकार लिखित आश्वासन देण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. मात्र हे सांगत असताना मंत्र्यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. "आंदोलन करणारे शेतकरी हे खरे शेतकरी असल्याचं आपल्याला वाटत नाही. शेतात काम करणारे खरे शेतकरी याबाबत चिंतेत आहेत असं आपल्याला वाटत नाही" असं कैलाश चौधरी यांनी म्हटलं आहे.

"आंदोलन करणारे शेतकरी हे खरे वाटत नाहीत", कृषी राज्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

काही राजकीय लोक आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. देशातील शेतकऱ्यांचा नव्या कृषी कायद्यांना पाठिंबा असल्याचं देखील चौधरी यांनी म्हटलं आहे. "मला वाटतं की राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे आणि विरोधी पक्ष शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम करत आहेत. काही राजकीय लोक आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि शेतकऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. देशात अशांतता पसरेल असा कोणताही निर्णय शेतकरी घेणार नाहीत, यावर माझा ठाम विश्वास आहे. या कायद्यांमुळे त्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. जे खरे शेतकरी आहेत, ते आपल्या शेतात काम करत आहेत आणि मला नाही वाचत की ते दु:खी आहेत" असं चौधरी यांनी म्हटलं आहे.

Web Title: farmers protest bjp leader satish punia slams ashok gehlot and rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.