शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेक्षक गॅलरीतून उडी मारण्याचा भाजप आमदाराचा प्रयत्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 05:19 IST

कोरोनामुळे प्रेक्षक गॅलरीत काही आमदारांना बसविले आहे. धुर्वे हे तेथे बसून बोलत असताना त्यांच्या  भावना अनावर झाल्या आणि ते कठड्याकडे झुकले, तेव्हा भाजपच्या दोन-तीन आमदारांनी त्यांना आवरले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी आमदार गॅलरीतून उडी घेण्याचा प्रयत्न केल्याने विधानसभेत एकच गोंधळ उडाला. हा तर सरळ आत्महत्येचा प्रयत्न असून हा गुन्हा आहे, असा आरोप संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी केला तर काँग्रेसचे नाना पटोले यांनी आमदारांच्या या कृतीचे विरोधी पक्ष समर्थन करतो काय, असा सवाल केला. गदारोळातच प्रश्नोत्तरे संपले.

धुर्वे यांनी आर्णी, जि. यवतमाळ येथील नगर परिषदेतील घोटाळ्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. शिवसेनेच्या नगरसेवकाने दीड वर्षांपूर्वी तक्रार केली, पण कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी नीलेश राठोड यांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, डॉ. धुर्वे यांनी केली. कोरोनामुळे प्रेक्षक गॅलरीत काही आमदारांना बसविले आहे. धुर्वे हे तेथे बसून बोलत असताना त्यांच्या  भावना अनावर झाल्या आणि ते कठड्याकडे झुकले, तेव्हा भाजपच्या दोन-तीन आमदारांनी त्यांना आवरले. आठ दिवसांत चौकशी केली जाईल व दोषींना निलंबित केले जाईल, असे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 

परब यांच्या टिप्पणीवरून  विरोधकांचा सभात्यागविरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या भाषणावर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी मंगळवारी केलेल्या टिपण्णीवरून मंगळवारी विधानपरिषदेत जोरदार गदारोळ माजला. परब यांनी विरोधी पक्षनेता आणि परिषद सभागृहाचा अपमान केला आहे. माफी मागेपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचे सांगत विरोधकांनी सभात्याग केला.

विरोधी पक्षनेते दरेकर यांचे भाषण सुरू असताना परब यांनी मध्ये उभे राहून टोमणा मारला. विधानसभेत याविषयावरील भाषणे मी ऎकली. विरोधी पक्षनेत्यांच्या भाषणात तेच मुद्दे आहेत. खालचेचे भाषण ते वाचून दाखवत आहे. फक्त त्यातली काही पाने सापडत नसल्याने त्यांची बहुदा लिंक तुटत आहे. त्यामुळे कोणीतरी खालच्या सभागृहातील भाषण आणून द्यावे, असा शेरा मंत्री परब यांनी मारला. त्यावर विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

विरोधी पक्षनेत्याने काय बोलायचे, कोणते मुद्दे मांडायचे याचा निर्णय परब घेणार का, असा सवाल करत सत्तेचा इतका अहंकार आला का, असे दरेकर म्हणाले. परब यांनी मात्र अपमान करण्याचा आपला हेतू नव्हता. दरेकर माझे चांगले मित्र आहेत. त्यांना दुखावण्याचा हेतू नव्हता, असा खुलासा केला. मात्र, दिलगिरी व्यक्त केली नाही.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBJPभाजपा