शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

"पोलीस खात्याचे इतके पोतेरे यापूर्वी कधी झाले नव्हते,’’ ठाकरे सरकारच्या त्या निर्णयावरून भाजपाची खरमरीत टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 22:05 IST

Maharashtra Politics News: भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी रमजान ईदसंबंधीच्या एका निर्णयावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. 

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारविरोधात विरोधी पक्ष असलेला भाजपा कमालीचा आक्रमक झालेला आहे. दरम्यान, कोरोनाकाळातील राज्य सरकारच्या अजून एका निर्णयावर आता भाजपाकडून खरमरीत टीका करण्यात आली आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी रमजान ईदसंबंधीच्या एका निर्णयावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.  रमजान ईदनिमित्त ईदीसाठी पोलीस दूध, ड्रायफ्रूट्स आणि किराणा साहित्य घरपोच करणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले होते. दरम्यान, या वृत्तावरून अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, पोलिसांमार्फत खंडणी गोळा करून झाली आता  पोलीस होम डिलिव्हरी करणार आहेत. ईदीसाठी घरपोच दूध, ड्रायफ्रुट आणि किराणा माल देणार. पोलिस खात्याचे इतके पोतेरे यापूर्वी कधी झाले नव्हते, असा टोला भातखळकर यांनी लगावला. 

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी  ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र या निर्णय़ाला विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने जोरदार विरोध केला होता. तसेच सोशल मीडियावरूनही टीका झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही, असे म्हणत जवळपास 6 कोटी रुपयांच्या खर्चाबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणPoliceपोलिसBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकर