pimpari-chinchwad : महापालिका मुख्यालयातच 'बाटलीराज', सुरक्षेचे तीनतेरा..!सुरक्षा यंत्रणेची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 15:38 IST2026-04-18T15:27:33+5:302026-04-18T15:38:35+5:30

, महापालिकेची सुरक्षा यंत्रणा केवळ कागदावरच कडक ?

pimpari-chinchwad Batli Raj at the municipal headquarters, security tightened | pimpari-chinchwad : महापालिका मुख्यालयातच 'बाटलीराज', सुरक्षेचे तीनतेरा..!सुरक्षा यंत्रणेची पोलखोल

pimpari-chinchwad : महापालिका मुख्यालयातच 'बाटलीराज', सुरक्षेचे तीनतेरा..!सुरक्षा यंत्रणेची पोलखोल

पिंपरी :  मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक, तपासणी व्यवस्था आणि सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे असतानाही दारूच्या बाटल्या इमारतीत पोहोचल्या कशा, हा आता चर्चेचा विषय ठरला आहे. इतकी कडक सुरक्षा असल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाला स्वतःच्या इमारतीतील बाथरूममध्ये काय सुरू आहे, याचाच पत्ता नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या घटनेमुळे केवळ एखाद्या कर्मचाऱ्याची शिस्तभंगाची बाब समोर आलेली नाही, तर सुरक्षा यंत्रणा केवळ कागदावरच कडक आहे का, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे फक्त शोभेपुरते आहेत की त्यांचे प्रत्यक्ष मॉनिटरिंग होते, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे या दारुच्या बाटल्या नेमक्या कोणी आणल्या होत्या. तसेच त्या इमारतीमध्ये घेऊन जाताना प्रवेशद्वारील सुरक्षा रक्षकांनी का रोखले नाही. संबंधीत व्यक्तींची त्यांनी तपासणी केली होती का? त्याचबरोबर यामध्ये अधिकारी सहभागी आहेत का, याची महापालिका आयुक्तांनी चौकशी करणे गरजेते आहे.

शिस्तीचा बोजबारा

नागरिकांमध्ये या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून, जिथून शहराच्या शिस्तीचे आदेश निघतात, तिथेच शिस्तीचा बोजवारा उडाला, अशी उपरोधिक प्रतिक्रिया उमटत आहे. प्रशासनाच्या प्रतिमेला तडा देणाऱ्या या प्रकारामुळे पालिकेतील अंतर्गत शिस्तीचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. आता आयुक्तांनी या प्रकाराची तातडीने चौकशी करून बाटल्या नेमक्या कुणाच्या, त्या आत कशा पोहोचल्या आणि सुरक्षा यंत्रणेने डोळेझाक का केली, याचा छडा लावणे गरजेचे ठरणार आहे.

Web Title : पिंपरी-चिंचवड नगर निगम मुख्यालय: शराब की बोतलें मिलीं, सुरक्षा में चूक उजागर!

Web Summary : पिंपरी-चिंचवड नगर निगम के बाथरूम में शराब की बोतलें मिलने से सुरक्षा में चूक उजागर हुई। सुरक्षा प्रभावशीलता और सीसीटीवी निगरानी पर सवाल उठे। जिम्मेदार व्यक्तियों की पहचान करने और उल्लंघन को दूर करने के लिए जांच की आवश्यकता है।

Web Title : Pimpri-Chinchwad Municipal HQ: Liquor Bottles Found, Security Lapses Exposed!

Web Summary : Liquor bottles found in Pimpri-Chinchwad Municipal Corporation's bathroom exposed security lapses. Questions arise about security effectiveness and CCTV monitoring. An investigation is needed to identify responsible individuals and address the breach.