'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 23:28 IST2026-04-20T23:26:51+5:302026-04-20T23:28:33+5:30

'लिव्ह इन पार्टनर'कडून होत असलेल्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून संबंधित महिलेने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

51-year-old woman attempts ending her after being harassed by 'live-in partner', case registered after death | 'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल

AI Generated Image

योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५१ वर्षीय महिलेच्या मृत्यू प्रकरणात गंभीर व धक्कादायक बाब समोर आली आहे. 'लिव्ह इन पार्टनर'कडून होत असलेल्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून संबंधित महिलेने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पार्टनरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

संबंधित ५१ वर्षीय महिला बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अपार्टमेंटमध्ये एकटीच रहायची. तिचा काही वर्षांअगोदर घटस्फोट झाला होता व तिची मुलं वडिलांसोबत राहतात. महिला नागपुरातील एका नामांकित दुकानात कार्यरत होती. आरोपी शशांक ज्ञानेश्वर गजभिये (४६, वाडी ) हा गेल्या काही काळापासून महिलेच्या संपर्कात होता. दोघांमध्ये जवळीक वाढल्यानंतर आरोपी वारंवार महिलेच्या घरी येत-जात होता व बऱ्याचदा तिच्यासोबत राहत होता. कालांतराने आरोपीने महिलेच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली आणि त्यातून वाद वाढू लागले. 

९ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास गजभियेने महिलेच्या घरात मोठा वाद घालत तिला बेडरूममधून ओढत हॉलमध्ये आणून मारहाण केली. शेजाऱ्यांसमोर हा प्रकार झाला होता. शेजाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांनाही धमकावले. तसेच मी तिचा खून केला तरी कोणी काही करू शकत नाही,अशा स्वरूपाची धमकी दिली होती. परिसरात गोंधळ उडाल्याने काही नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, तेव्हापर्यंत वाद आटोपला होता आणि आरोपीने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगून पोलिसांना परत पाठवले. यानंतरही आरोपी महिलेवर चारित्र्याबाबत संशय घेऊन सतत वाद घालत होता. 

या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून महिलेने १० एप्रिलच्या पहाटेच्या सुमारास आपल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या घटनेत तिच्या हाताला फ्रॅक्चर झाले तसेच शरीरावर गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर आरोपीनेच काही स्थानिकांच्या मदतीने जखमी महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिला मेंदूचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. प्रारंभी हा अपघाती मृत्यू असल्याचे मानले जात होते. मात्र, मृत महिलेच्या मुलाने शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार, आरोपीच्या सततच्या छळामुळेच आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी गजभियेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मी क्राईम ब्रांचमध्ये काम करतो

९ एप्रिल रोजी शेजाऱ्यांसमोर महिलेला मारहाण करत वाद घालताना गजभियेने शिवीगाळ केली होती. शेजाऱ्यांनादेखील तो मारायला धावला होता. मी महिलेचा खून जरी केला तरी कुणीच माझे काही बिघडवू शकत नाही. मी क्राईम ब्रांचमध्ये काम करतो असे म्हणत त्याने इतरांना धमकी दिली होती.

Web Title : नागपुर: लिव-इन पार्टनर से प्रताड़ित होकर महिला ने की आत्महत्या

Web Summary : नागपुर में एक 51 वर्षीय महिला ने अपने लिव-इन पार्टनर से कथित उत्पीड़न के कारण इमारत से कूदकर आत्महत्या कर ली। आरोपी उसे शारीरिक और मानसिक रूप से प्रताड़ित करता था, जिसके कारण उसने आत्महत्या का प्रयास किया। पुलिस ने उसके खिलाफ मामला दर्ज कर लिया है।

Web Title : Nagpur: Woman Ends Life Due to Live-in Partner's Harassment

Web Summary : A 51-year-old Nagpur woman died after jumping from her building due to alleged harassment by her live-in partner. He physically and mentally abused her, leading to her suicide attempt. Police have registered a case against him.