Crime News : तुला कामाचे पैसे पाहिजेत का? म्हणत टोळक्याकडून चालकाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:34 IST2026-04-28T12:33:51+5:302026-04-28T12:34:04+5:30
Crime News : बिलाचे पैसे मागितले असता संशयितांनी “तुला पैसे पाहिजेत का?” असे म्हणून शिवीगाळ करत हॉकी स्टिकने मारहाण केली.

Crime News : तुला कामाचे पैसे पाहिजेत का? म्हणत टोळक्याकडून चालकाला मारहाण
पिंपरी : कामाच्या बिलाचे पैसे मागितल्याच्या रागातून एका चालकाला आणि त्याच्या वडिलांना टोळक्याने मारहाण केली. ही घटना रविवारी (२६ एप्रिल) रात्री १२.४१ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील काळुस येथे घडली.
याबाबत अक्षय किसन डुंबरे (वय २२, रा. काळुस, ता. खेड) यांनी चाकण उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल आवटे, अजय बवले, निखिल खैरे, सत्यवान म्हसाडे, मारुती गव्हाणे आणि इतर २ ते ३ अनोळखी मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने संशयितांकडे बिलाचे पैसे मागितले असता संशयितांनी “तुला पैसे पाहिजेत का?” असे म्हणून शिवीगाळ करत हॉकी स्टिकने मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या शेखर पोटवडे यालाही मारहाण करण्यात आली. फिर्यादीचे वडील संशयितांना थांबवण्याचा प्रयत्न करत असताना संशयितांनी त्यांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यांना बोनेटवर सुमारे १०० फूट फरफटत नेले, ज्यामध्ये ते खाली पडून जखमी झाले.