Crime News: दारू पिताना मोबाइल चार्जिंगवरून वाद, तरुणाला दगडावर ढकलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 16:11 IST2026-04-26T16:11:07+5:302026-04-26T16:11:26+5:30
Crime News - मोबाइल चार्जिंगवरून झालेल्या वादातून तरुणाला इंद्रायणी नदीच्या किनारी असलेल्या दगडांवर ढकलून देऊन गंभीर जखमी केले.

Crime News: दारू पिताना मोबाइल चार्जिंगवरून वाद, तरुणाला दगडावर ढकलले
पिंपरी : मोबाइल चार्जिंगवरून झालेल्या वादातून तरुणाला इंद्रायणी नदीच्या किनारी असलेल्या दगडांवर ढकलून देऊन गंभीर जखमी केले. ही घटना खेड तालुक्यातील निघोजे येथे गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली आहे.
युवराज जोशी (रा. सुभाषवाडी, निघोजे, ता. खेड, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशकुमार राजकुमार केवट (वय ३४, रा. निघोजे, मूळ रा. मध्य प्रदेश) असे जखमीचे नाव असून त्यांनी याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि संशयित नदीच्या जुन्या पुलाजवळ दारू पिण्यासाठी बसले होते. संशयिताने आपला मोबाइल फिर्यादीच्या मित्राकडे चार्जिंगला दिला होता.
मुकेश तो वेळेवर घेऊन न आल्याने चिडलेल्या संशयिताने फिर्यादीशी वाद घातला आणि शिवीगाळ करत त्यांना नदीच्या किनारी दगडांवर ढकलून दिले. यात फिर्यादीच्या चेहऱ्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.