भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवली दुचाकी; रस्ता दुभाजकाला धडकून तरुणाचा जागीच मृत्यू, निगडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 13:41 IST2026-04-20T13:39:39+5:302026-04-20T13:41:01+5:30
दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने एका २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र जखमी झालाआहे

भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवली दुचाकी; रस्ता दुभाजकाला धडकून तरुणाचा जागीच मृत्यू, निगडीतील घटना
पिंपरी : भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने रस्त्यामधील दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने एका २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र जखमी झाला. ही धक्कादायक घटना दि. २९ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास निगडीतील फोर्समोटर कंपनीसमोर थरमॅक्स चौकाजवळ घडली.
विकास गोविंद पवार (वय २१) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत धनंजय गोविंद पवार (वय ४८, रा. भीमशक्तीनगर, मोरीवस्ती, चिखली) यांनी शुक्रवारी (दि. १७) पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय पवार यांचा भाऊ विकास पवार हा आपल्या मित्र सिद्धार्थ अजित धाईजे (वय २०, रा. इ १/१०, राजनगर, ओटास्किम, निगडी) व पवन गव्हाळे यांच्यासोबत दुचाकीने प्रवास करत होता.
सिद्धार्थ धाईजे याने दुचाकी हयगयीने, अत्यंत भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवताना दुचाकी थेट रस्ता दुभाजकाला आदळली. या भीषण अपघातात पवन गव्हाळे जखमी झाला, तर विकास पवार याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.