सुनील शेट्टीच्या (होणाऱ्या) कोट्यधीश सूनबाईंची सोशल मीडियात चर्चा, कोण आहे अहान शेट्टीची गर्लफ्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2023 04:16 PM2023-02-23T16:16:19+5:302023-02-23T16:21:52+5:30

Who is Tania Shroff? Tadap Star Ahan Shetty's Girlfriend अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफ हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

बॉलिवूडमधला डॅशिंग अभिनेता अर्थात सुनील शेट्टी, आपल्या दबंग अभिनयासाठी ओळखला जातो. त्याची लाडकी कन्या अथिया शेट्टीने नुकतंच के.एल राहुलसह लग्नगाठ बांधली. सुनीलचा मुलगा अहान शेट्टी देखील तितकाच चर्चेत असतो. त्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याचा तडप हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एवढा चालला नाही. मात्र, अहानची चर्चा त्याच्या प्रेयसीमुळे प्रचंड होते.

अहानच्या सुंदर प्रेयसीचे नाव तानिया श्रॉफ आहे. तिचा जन्म २९ मार्च १९९७ साली झाला. गेल्या दहा वर्षांपासून ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी शालेय शिक्षण देखील एकाच शाळेतून, म्हणजेच अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे यामधून पूर्ण केलं आहे. अहानच्या कुटुंबीयांसोबत तिची खूप चांगली जवळीक आहे.

अथिया आणि राहुलच्या लग्नात तानियाची बरीच चर्चा रंगली होती. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्नसोहळ्याचे काही फोटो शेअर केले होते. हळद, संगीत, मेहेंदी आणि लग्न प्रत्येक सोहळ्यात तिने हजेरी लावली होती.

पापाराझींना अहान आई - वडिलांपेक्षा आपल्या प्रेयसीसोबत जास्त दिसतो. तानिया सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असून, त्या दोघांचे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होतात.

तानिया एक सामान्य मुलगी नसून, अरबपतीची मुलगी आहे. प्रसिद्ध उद्योजकांपैकी एक उद्योजक जयदेव श्रॉफ यांची ती कन्या आहे. जयदेव हे युपीआय लिमिटेड कंपनीचे ग्लोबल सीईओ असून, फोर्ब्सवरील माहितीनुसार त्यांच्याकडे दीड बिलियन डॉलर्स इतकी संपत्ती आहे.

तानियाचे आजोबा रजनीकांत श्रॉफ हे देखील अरबपती आहे. २०२० मध्ये 'सर्वात श्रीमंत भारतीयांच्या' यादीत त्यांचे नाव होते. तिला वरूण श्रॉफ नावाचा मोठा भाऊही आहे.

तानिया आपल्या वडिलांची लाडकी कन्या आहे. ती व्यवसायाने फॅशन डिजाईनर आणि इन्फ्लुएन्सर आहे. तिने लंडन कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनमधून, फॅशन डिजाईनर या पदवीची बॅचलर डिग्री घेतली आहे.

फॅशन डिजाईनरसह ती एक फिटनेस फ्रिक देखील आहे. तिची बॉडी नेहमी टोन्ड असते. ती फॅशनेबल कपड्यांमधून आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसते. तिला प्रवास करायला प्रचंड आवडते, तानिया अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नव्या डेस्टिनेशन फोटो पोस्ट करताना दिसून येते.

फॅशनेबल सौंदर्यवती म्हणजेच तानिया नेहमीच फोटोशूट करत असते. अनेकदा ती प्रसिद्ध मासिकांच्या फ्रंट पेजवरही दिसून आली आहे. तिला मॉडेलिंगची खूप आवड आहे आणि जाण सुद्धा आहे. तिने मॉडेलिंग या विश्वात २०१५ साली पाऊल ठेवले होते.