"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 11:39 AM2024-06-16T11:39:28+5:302024-06-16T11:40:30+5:30

Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी नुकतेच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले

Chandrashekhar Bawankule slams Uddhav Thackeray over Muslim Votes in Lok Sabha Election 2024 | "मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला

"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray: देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्याचे निकालही लागले. त्यानंतर भाजपप्रणित NDAचे सरकार स्थापन झाले असून पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथही घेतली. असे असले तरीही राज्यस्तरावर आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरु आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बाजी मारली. महायुतीला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यानंतर महायुतीच्या नेतेमंडळींकडून सातत्याने मविआ आघाडीला लक्ष्य केले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुस्लीमबहुल विभागातून जास्त मते मिळाली असा दावा गेले काही दिवस महायुतीचे नेते करत आहेत. याचबाबत आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

"उद्धव ठाकरेंच्या उमेदरावांना जे मतदान झाले, त्यात मुस्लीम मतांचा वाटा जास्त म्हणजे ५१ टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. या गोष्टींचा जर उद्धवजींना अभिमान वाटत असेल तर त्यांचे त्यांना लखलाभ आहे. पण हिंदूहृहयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे पाहत असतील तेव्हा त्यांच्या मनाला आणि आत्म्याला वाईट वाटत असेल. पण खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी हा मोठा दगाफटका आहे," असे रोखठोक मत मांडत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

दरम्यान, लोकसभेप्रमाणे विधानसभेची निवडणूकही सर्व मित्रपक्षांना घेऊन लढणार असल्याचे शनिवारी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. "लोकसभा निवडणुकीत असे वातावरण होते की कोणी भाजपविरोधात लढू शकत नाही, पण त्यांचा हा अजिंक्यपणा किती फोल आहे हे जनतेने दाखवून दिले. तरीही भाजपला वास्तवाची जाणीव झाली नसेल तर विधानसभा निवडणुकीत त्यांना विस्तवाला सामोरे जावे लागेल. ही लढाई सुरू झाली आहे. पुन्हा अधिक ताकदीने निवडणुकांना सामोरे जाणार असून, यासाठी विधानसभेचे जागावाटपही लवकरच पूर्ण होईल. राज्यात निश्चितपणे सत्ताबदल होईल," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title: Chandrashekhar Bawankule slams Uddhav Thackeray over Muslim Votes in Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.