शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 12:07 PM2024-06-16T12:07:13+5:302024-06-16T12:07:42+5:30

शाहरुख खानच्या शिक्षकांची प्रकृती गंभीर असून त्यांनी एका कॉंग्रेस नेत्याकरवी किंग खानला शेवटची विनंती केली आहे (shahrukh khan)

Shahrukh khan teacher condition is not well he expressed his last wish to shahrukh | शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

बॉलिवूडचा  बादशाह शाहरुख खान हा सर्वांचा फेव्हरेट अभिनेता.  शाहरुखने आजवर विविध सिनेमांंमध्ये बहुरंगी भूमिका साकारुन स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलंय. शाहरुखचे सिनेमे म्हणजे सुपरहिटची गॅरंटी असते. शाहरुखचे चाहतेही त्याच्यावर जीव ओवाळत असतात. शाहरुखही वेळोवेळी त्याच्या फॅन्सना सरप्राईज देऊन त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करतो. अशातच शाहरुखविषयी एक वेगळी बातमी समोर येतेय. शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती गंंभीर असून त्यांनी शेवटची विनंती केलेली दिसली. 

शाहरुखच्या शिक्षकांनी व्यक्त केली शेवटची इच्छा

काँग्रेस नेत्या जरिता लायतफ्लांग यांनी इंस्टाग्रामवर शाहरुख खानला त्याचे माजी शिक्षक ब्रदर एरिक डिसूझा यांना भेटण्याची विनंती केली. शाहरुखने गोव्यात येऊन आपल्या गुरूला भेटावं अशी विनंती त्यांनी या व्हिडीओत केलेली दिसली. व्हिडिओ शेअर करताना त्या शाहरुखला म्हणाल्या, "कृपया काही मिनिटं वेळ काढून शाहरुख तुझ्या शिक्षकाला भेटायला ये. गोवा मुंबईपासून फार दूर नाही. फक्त एक तासाची फ्लाइट आहे... त्यांची तब्येत खूपच खालावली आहे आणि ते आता बोलूही शकत नाही."

शाहरुख गुरुची शेवटची इच्छा करणार पूर्ण?

व्हिडीओसोबत जरिता यांनी ट्विट केले आहे की, "हे माझे शेवटचे आवाहन आहे. ब्रदर एरिक एस डिसोझा आणि शाहरुख यांची भेट घडवून आणण्याचा माझा शेवटचा प्रयत्न आहे. एरिक यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. शाहरुखच्या भेटीने त्यांच्या आजारी आयुष्याला दिलासा मिळेल. एरिक यांनी आपल्या सर्वांच्या जीवनावर अमीट छाप सोडली आहे. आपल्याला जे काही मिळालंय हे त्यांचीच शिकवण आहे. शाहरुख तू केलेली भेट त्यांच्या काळोख्या काळातील आशेचा किरण ठरेल." दुसऱ्या ट्विटमध्ये जरिता यांनी 'जीना इसी का नाम है' च्या जुन्या एपिसोडमधील एरिक आणि शाहरुखची क्लिप शेअर केली. शोमध्ये गुरु-शिष्याने एकमेकांना मिठी मारल्याचं दिसतंय. शाहरुख गोव्यात जाऊन त्याच्या शिक्षकाची भेट घेणार का, हे पाहाणं औत्सुक्याचं आहे.

Web Title: Shahrukh khan teacher condition is not well he expressed his last wish to shahrukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.