मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 10:14 AM2024-06-16T10:14:05+5:302024-06-16T10:14:26+5:30

मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपल्या ताफ्यातील गाडी देऊन जवळच्या गोदरेज रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यास सांगितले.

The Chief Minister ran like an angel A helping hand to accident victims | मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय

मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकमत न्यूज नेटवर्क संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून रस्त्यावर अपघातग्रस्तासाठी ते देवदूत ठरले. शुक्रवारी रात्री दीड वाजता पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्यातील आपल्या घराकडे परतत असताना विक्रोळीनजीक दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तत्काळ गाडी थांबवून या अपघातग्रस्त नागरिकांची चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आपला ताफा थांबवून या अपघातग्रस्त तरुणाची आणि एका मुस्लिम कुटुंबाची चौकशी केली. यात तरुण आणि मुस्लिम कुटुंबातील महिलेला दुखापत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या ताफ्यातील गाडी देऊन जवळच्या गोदरेज रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यास सांगितले. सोबत आपला अधिकारी देखील मदतीसाठी दिला. रात्री उशिरा त्यांच्यावर उपचार केल्यानंतर आता दोघेही सुखरूप असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुढील उपचार सुरू आहेत.

Web Title: The Chief Minister ran like an angel A helping hand to accident victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.