Chiplun Flood: चिपळूणमध्ये महाप्रलय; १२ फुटांपर्यंत पाणी, एसटी डेपो बुडाला...घरंही पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 01:16 PM2021-07-22T13:16:37+5:302021-07-22T13:42:05+5:30

कोकणातील अतिवृष्टीमुळे रत्नागिरीतील चिपळूणला पुराचा मोठा फटका बसला आहे. २००५ सालच्या पुरापेक्षाही भयंकर परिस्थिती कोकणात निर्माण झाली आहे.

कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून याचा चिपळूणला मोठा फटका बसला आहे. चिपळूणचा एसटी डेपो पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. लोक एसटीच्या टपावर बसून आहेत इतकं पाणी साचलं आहे.

चिपळूणमध्ये अनेक ठिकाणी पावासामुळे झाडं कोसळली असून अनेक घरांचं मोठं नुकसान झालं आहे.

चिपळूणची मुख्य बाजारपेठ देखील पाण्याखाली गेली असून अनेक दुकांनांमध्ये पाणी शिरलं आहे.

बाजारपेठेतील दुकानांचे तळमजले अक्षरश: पाण्याखाली गेले आहेत. एनडीआरफच्या टीम्स आता चिपळूणमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

चिपळूणमधील अनेक गावांमध्ये पाणी शिरलं असून घरं देखील पाण्याखाली गेली आहेत.

चिपळूण बाजारपेठेला तर नदीचं रुप प्राप्त झालं आहे. २००५ सालापेक्षाही भयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

कोकणात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळाधार पाऊस सुरू असून काल रात्रीपासूनच चिपळूणला याचा मोठा फटका बसण्यास सुरुवात झाली.

चिपळूणमधील पूर परिस्थिती पाहता येथे तातडीनं मदत कार्य पोहोचवणं आता अत्यंत महत्वाचं झालं असून हेलिकॉप्टर्सची मदत देखील घेतली जाणार असल्याचं मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

मुख्य शहरात देखील अनेक ठिकाणी पाण्याचं साम्राज्य पसरलं आहे.

चिपळूणच्या बाजारपेठेतील ही काल रात्रीची परिस्थिती. संपूर्ण दुकानं पाण्याखाली गेल्याचं चित्र.

अनेक ठिकाणी पाण्याचं साम्राज्य पसरलं असून काही ठिकाणी चक्क १२ फुटांपर्यंत पाणी साचलं आहे.

पाण्याचा वेग देखील तीव्र असल्याचं दिसून येत आहे. यात नुकसानासह जीवीतहानी होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

पुरामुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत.

चिपळूणमध्ये अभूतपूर्व परिस्थिती पाहायला मिळत आहे. प्रशासन देखील अलर्ट झालं असून मदतकार्याला सुरुवात झाली आहे.

चिपळूणच्या मुख्य शहरीभागात देखील अनेक सोसायट्यांमध्ये तळमजल्यापर्यंत पाणी साचलं आहे.

Read in English