वाह महाराज जी, वाह! दिग्विजय सिंहांच्या विधानानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी जोडले हात, नेमकं काय घडलं?

By प्रविण मरगळे | Published: February 4, 2021 03:45 PM2021-02-04T15:45:27+5:302021-02-04T15:50:28+5:30

, २६ जानेवारीला झालेल्या हिंसक आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे, येत्या ६ फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे, गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या संख्येने शेतकरी जमले आहेत, त्यामुळे पोलिसांनी बॅरिगेट्स, लोखंडी खिळे, सिमेंटच्या भिंती उभारून खबरदारी घेतली आहे

कुठल्याही प्रकारचा वाद न होता मार्ग सुटावा यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत. कारण काटेरी तारा आणि सीमेंटच्या भिंती तयार केल्याने ही समस्या सुटणार नाही. आवश्यकता वाटल्यास काही नेत्यांना शेतकऱ्यांशी चर्चेदरम्यान बोलावले जाऊ शकते. कारण आम्हा सर्वांना मिळून एकत्रितपणे हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करावा लागेल असं माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी म्हटलं आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शेतकरी आंदोलनावरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली, काँग्रेसचा हात सोडून भाजपात सहभागी झालेले राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी मोदी सरकारची बाजू मांडली. यावेळी शिंदे यांनी काँग्रेसच्या आपल्या जुन्या सहकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

तर दुसरीकडे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या वक्तव्यावर चिमटा काढला, सिंह म्हणाले की, ज्याप्रकारे तुम्ही यूपीए सरकारची बाजू ठेवत होते, तसेच मोदी सरकारच्या बाजूने बोलत आहात, वाह महाराज जी वाह...

भाजपा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी नवीन कृषी विधेयकावर सरकारी बाजू मांडत म्हणाले की, शेतकरी देशाचा महत्त्वाचा घटक आहे, अन्नदाता आहे, ते स्वत:चं नव्हे तर संपूर्ण जगाचं पोट भरत असतात. ३ कृषी विधेयकं याच शेतकऱ्यांना प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणार आहे. देशाला ७० वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं तरीही वास्तविकपणे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालं नव्हतं.

कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालं आहे, देशभरात कुठेही ते आपला माल विकून उत्पन्न कमवू शकतात. शेतकऱ्यांसोबत सरकारने ११ वेळा चर्चा केली, इतकचं नाही तर पुढील १८ महिने हा कायदा लागू होण्याला स्थगितीही दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हटलं की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कृषी क्षेत्रात सुधारणा आणण्याचं आश्वासन स्वत: काँग्रेसने दिलं होतं, त्याशिवाय राष्ट्रवादीचे नेते आणि यूपीए सरकारमधील कृषीमंत्री शरद पवार यांनीही २०१०-११ मध्ये प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं,

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हटलं की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कृषी क्षेत्रात सुधारणा आणण्याचं आश्वासन स्वत: काँग्रेसने दिलं होतं, त्याशिवाय राष्ट्रवादीचे नेते आणि यूपीए सरकारमधील कृषीमंत्री शरद पवार यांनीही २०१०-११ मध्ये प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं,

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या विधानावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार दिग्विजय सिंह यांनी अतिशय चांगल्याप्रकारे मोदी सरकारची बाजू मांडल्याबद्दल शिंदेंचे कौतुक केले. त्यांनी म्हटलं की, सभापती महोदय, मी तुमच्या माध्यमातून शिंदे यांचं कौतुक करतो, जे उत्तमरित्या यूपीएच्या सरकारमध्ये बाजू मांडत होते, त्याचप्रकारे त्यांनी आज भाजपाची बाजू मांडली.

तुमचे अभिनंदन, वाह महाराज जी वाह..यावर ज्योतिरादित्य शिंदे यांनी तुमचेच आशीर्वाद असल्याचं म्हटलं, तर त्यावर उत्तर देताना दिग्विजय सिंह म्हणाले की, नेहमी राहील, तुम्ही ज्या पक्षात असाल तिथे पुढे जात राहो, आमचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे आणि यापुढेही राहील.