पोलिसवाली, बॉक्सर की सुपरमॉडेल! तिच्या सौंदर्यावर सारेच फिदा, आनंद महिंद्रांनीही ऑफर केलं होतं खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 02:45 PM2022-12-14T14:45:55+5:302022-12-14T14:50:04+5:30

Eksha Kerung: इन्स्टाग्रामवर सध्या एका पोलिसवाल्या तरुणीच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे तिने टीव्हीवरील रियालिटी शो एमटीव्ही सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन २ मध्येही भाग गेतला होता. खुद्द आनंद महिंद्रानींही तिला जावा बाईक ऑफर केली होती.

इन्स्टाग्रामवर सध्या एका पोलिसवाल्या तरुणीच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे तिने टीव्हीवरील रियालिटी शो एमटीव्ही सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन २ मध्येही भाग गेतला होता. खुद्द आनंद महिंद्रानींही तिला जावा बाईक ऑफर केली होती.

महिलांनी आपला दबदबा निर्माण केला नाही असं कुठलंही क्षेत्र आज राहिलंलं नाही. आपण ज्या महिलेबाबत बोलत आहोत ती सुपरमॉडेल तर आहेच सोबतच ती पोलीस खात्यात काम करते तसेच अव्वल दर्जाची बॉक्सरही आहे. इन्स्टाग्रामवर तिचे फोटो पाहून ही मॉडेल आहे की पोलीसवाली यावर क्षणभर विश्वासही बसत नाही.

तिला बाईक्सची आवड आहे. त्यामुळे खुद्द आनंद महिंद्रांनी तिला जावा बाईक ऑफर केली होती. या सुपरमॉडेल पोलिसवालीचं नाव आहे एक्षा हांग सुब्बा उर्फ ईक्षा केरुंग.

ईक्षा ही १९ वर्षांची असताना ती सिक्कीम पोलीस फोर्समध्ये दाखल झाली होती. ही गोष्ट २०१९ मधील आहे. आता ती पोलीस कर्मचारी आहे. सोबतच ती मॉडेलिंगसुद्धा करते. मॉडेलिंग आणि बॉक्सिंक करणे हे तिचं स्वप्न होतं. तिने एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ द इयर सिझन-२मध्ये भागही घेतला होता. या शोमध्ये खुद्द मलायका अरोडाने तिचं कौतुक केलं होतं.

ती इन्स्टाग्रामवरही खूप फेमस आहे. इन्स्टावर तिचे १.९२ लाख फॉलोअर्स आहेत. तिला बाईक्सचीही खूप आवड आहे. ती नेहमी रॉयल एनफिल्ड हिमालयन ते जावा बॉबर बाइक चालवताना दिसते.

ईक्षा ही सिक्कीममधील सोरोंग भागातील रुंबूक नावाच्या एका छोट्याशा गावातील रहिवासी आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यामागे वडिलांचा मोलाचा वाटा आहे, असे ती प्रांजळपणे सांगते.