चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 11:40 IST2026-05-02T11:35:18+5:302026-05-02T11:40:41+5:30

देशभरात चहा प्रेमींची कमतरता नाही. भारत हा असा एकमेव देश आहे जिथे सर्वाधिक चहा प्यायला जातो. काही लोकांची सकाळ चहानेच होते

What is the best time to drink tea This time is called the golden hour what is the wrong time | चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर

चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर

देशभरात चहा प्रेमींची कमतरता नाही. भारत हा असा एकमेव देश आहे जिथे सर्वाधिक चहा प्यायला जातो. काही लोकांची सकाळ चहानेच होते. लोक वेगवेगळ्या प्रकारचा चहा पितात. आजकाल हर्बल टी पिणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे, परंतु दूध असलेला चहाच सर्वाधिक प्यायला जातो. चहा सर्वच पितात, पण चहा पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती हे तुम्हाला माहीत आहे का? येथे आम्ही तुम्हाला चहा पिण्याचा 'गोल्डन अवर' कोणता आहे ते सांगणार आहोत.

चहा पिण्याची सर्वात चुकीची वेळ

सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं सर्वात वाईट मानलं जातं. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानं कोर्टिसोल पातळी वाढू शकते आणि कालांतराने अल्सरची समस्याही उद्भवू शकते. रात्री झोपण्यापूर्वी काही तास आधी चहा पिणं आरोग्यास हानी पोहोचवू शकतं, कारण यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो. अ‍ॅसिडिटीची समस्या असल्यास चहाचं सेवन करू नये. जेवणाच्या अगदी आधी किंवा नंतर चहा पिणं टाळावे.

आयर्न (लोह) सप्लिमेंट्ससोबत चहा पिऊ नये, कारण चहामधील टॅनिन्स लोहाच्या शोषणात अडथळा आणू शकतात. त्यामुळे आयर्न सप्लिमेंट सोबत चहा टाळणंच उत्तम.


चहा पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?

१. सकाळी उठल्यानंतर १-२ तासांनी: सकाळी १२ वाजेच्या आधी चहा पिणं योग्य आहे, परंतु तो नाश्ता केल्यानंतरच घ्यावा. सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानं गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो, म्हणून नाश्ता केल्यावर १-२ तासांनीच चहा प्यावा.

२. रात्रीची वेळ: कधीकधी रात्रीही चहा प्यायल्यास चालू शकं, परंतु रात्री चहा फक्त त्याच लोकांनी प्यावा ज्यांची नाईट शिफ्ट सुरू आहे.

Web Title : चाय पीने का सबसे अच्छा समय: गोल्डन आवर का खुलासा

Web Summary : खाली पेट या आयरन सप्लीमेंट के साथ चाय पीने से बचें। नाश्ते के एक से दो घंटे बाद या रात की शिफ्ट के दौरान चाय पीना सबसे अच्छा है। इन समय पर चाय पीने से गैस और एसिडिटी की समस्याओं में मदद मिल सकती है।

Web Title : Best Time to Drink Tea: Golden Hour Revealed

Web Summary : Avoid tea on an empty stomach or with iron supplements. The best time is one to two hours after breakfast or during a night shift. Drinking tea at these times can help with gas and acidity issues.

टॅग्स :foodअन्न