Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 11:26 IST2026-05-02T11:04:49+5:302026-05-02T11:26:22+5:30
जबलपूरमधील अपघातानंतरचे फोटो सर्वांना रडायला लावत आहेत. या अपघातात प्राण गमावलेल्या आई आणि मुलाचे फोटोही मन हेलावून टाकणारे आहेत. लाईफ जॅकेट घातलेले असूनही आई आणि मुलगा कसे बुडाले, असा प्रश्न या फोटोंमुळे निर्माण झाला आहे.

जबलपूरमधील अपघातानंतरचे फोटो सर्वांना रडायला लावत आहेत. या अपघातात प्राण गमावलेल्या आई आणि मुलाचे फोटोही मन हेलावून टाकणारे आहेत. लाईफ जॅकेट घातलेले असूनही आई आणि मुलगा कसे बुडाले, असा प्रश्न या फोटोंमुळे निर्माण झाला आहे.

अपघातानंतर असे काही फोटो समोर येतात, हे फोटो लोकांना रडायला लावतात. तुर्कस्तानमधील भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली गाडलेल्या मुलीचा आक्रोश असो किंवा अहमदाबाद विमान अपघातानंतर विखुरलेले मृतदेह असोत, हे दोन्ही फोटो आपल्याला भावूक करतात.

गुरुवारी झालेल्या जबलपूर क्रूझ अपघातानंतर असाच एक फोटो समोर आला आहे. येथे क्रूझ बोट उलटल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला. यावेळी एक आई आपल्या निष्पाप मुलाला लाईफ जॅकेट घालून छातीशी कवटाळून होती, पण त्या दोघांचाही मृत्यू झाला. आई आणि मुलगा दोघांनीही लाईफ जॅकेट घातले असतानाही ते दोघे कसे बुडाले?, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

जबलपूरमध्ये ज्यावेळी क्रूझ शिपचा अपघात झाला, त्यावेळी बोटीवरील लोकांनी लाईफ जॅकेट घातले नव्हते. जेव्हा बोट बुडू लागली, तेव्हा घाईघाईने लाईफ जॅकेटचे वाटप सुरू झाले. याच दरम्यान, त्या महिलेने आपल्या मुलाला स्वतःच्या लाईफ जॅकेटमध्ये घट्ट बांधले. इथेच सर्वात मोठी चूक झाली.

तज्ञांच्या मते, लाईफ जॅकेट व्यक्तीला पाण्यावर तरंगत ठेवण्यासाठी बनवलेले असते. ते योग्य वेळी आणि व्यवस्थित घातल्यास तुमचा जीव वाचवू शकते. पण त्या महिलेने आपल्या मुलालाही स्वतःच्या लाईफ जॅकेटमध्ये ठेवले होते, यामुळे संतुलन बिघडले आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

एका लाईफ जॅकेटमध्ये एकच व्यक्तीसाठी असते.त्यातून एकाच व्यक्तीला पाण्यावर तरंगते ठेवण्यासाठी बनवलेले एक विशेष प्रकारचे तरंगणारे फोम आहे. ते घालताना खूप खबरदारी घेणे आवश्यक असते, अन्यथा ते ऐनवेळी निकामी होऊ शकते आणि घालणाऱ्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागू शकतो.

जबलपूर क्रूझ शिप अपघातात नेमके हेच घडले. तज्ञांच्या मते, आईने आपल्या मुलाला स्वतःच्याच लाईफ जॅकेटमध्ये ठेवले होते. लाईफ जॅकेट घालणाऱ्या व्यक्तीचे डोके पाण्यावर आणि शरीर पाण्यावर तरंगते ठेवण्यासाठी बनवलेले असते. मात्र, जबलपूर अपघातात आईने ते योग्यरित्या घातले नव्हते.

लाईफ जॅकेट एका व्यक्तीला पाण्यावर तरंगते ठेवण्यासाठी बनवलेले असते, परंतु जेव्हा एकाच वेळी दोन व्यक्ती त्यात असतात, तेव्हा ते योग्यरित्या काम करत नाही, यामुळे घालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

















