कोण आहे भंवर सिंहची भूमिका साकारणारा फहाद फासिल? Pushpa 2 मध्ये देणार पुष्पाराजला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 12:36 PM2022-01-21T12:36:17+5:302022-01-21T12:42:01+5:30

Fahadh faasil: या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबतच आणखी एक भूमिका चर्चेत आली ती म्हणजे इंस्पेक्टर भंवर सिंहची. या चित्रपटात भंवर सिंहने पुष्पाला चांगलीच टक्कर दिली आहे.

2021 या वर्षात सर्वात सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे पुष्पा: द राइज. हा चित्रपट केवळ 2021 चं नव्हे तर 2022 चंही वर्ष गाजवतांना दिसत आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी अशा भाषांमध्ये प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे तो सगळ्या भाषांमध्ये सुपरहिट ठरला.

या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबतच आणखी एक भूमिका चर्चेत आली ती म्हणजे इंस्पेक्टर भंवर सिंहची. या चित्रपटात भंवर सिंहने पुष्पाला चांगलीच टक्कर दिली आहे.

पुष्पा गाजल्यानंतर त्याचा पार्ट २ देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे पार्ट २ मध्ये भंवर सिंह पुष्पाला टक्कर देणार आहे. त्यामुळेच भंवर सिंह ही भूमिका साकारणारा अभिनेता नेमका कोण हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

भंवर सिंह ही भूमिका साऊथ स्टार फहाद फासिल याने साकारली आहे. फहाद अभिनेता असण्यासोबतच एक निर्मातादेखील आहे.

2002 साली करिअरची सुरुवात करणारा फहाद त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो.

2018 साली बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर म्हणून त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.

फहाद केरळमधील आलप्पुषा येथे राहत असून त्यांनी २०१४ मध्ये नजरिया नजीमसोबत लग्न केलं आहे.

पुष्पा 2 मध्येदेखील फहाद झळकणार असून यात ते पुष्पाला टक्कर देताना दिसणार आहेत.

फहाद दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे.

फहादने आतापर्यंत अनेक सुपरस्टार्स सोबत काम केलं आहे.