PHOTOS: बाबर आझम आणि प्रसिद्ध अभिनेत्री करणार लग्न? नाझीशने चर्चांना दिला पूर्णविराम!

Babar Azam And Nazish Jahangir: बाबर आझमला पुन्हा एकदा पाकिस्तानचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

पाकिस्तानी संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. बाबर आझमला पुन्हा एकदा पाकिस्तानचा कर्णधार बनवण्यात आले आहे. मात्र, खराब स्ट्राईक रेटमुळे बाबर पुन्हा चर्चेत आहे.

बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानला न्यूझीलंडच्या नवख्या संघाकडून पराभव पत्करावा लागला. यावरून शेजारील देशातील माजी खेळाडू आपल्या संघाला घरचा आहेर देत आहेत.

अशातच चाहत्यांनी बाबर आणि पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री नाझीश जहांगीर लग्न करणार असल्याच्या अफवा पसरवल्या. यावरून संबंधित अभिनेत्री चांगलीच संतापली आहे.

अभिनेत्री नाझीशने राष्ट्रीय संघातील सर्व खेळाडू मला भावासमान असल्याचे स्पष्ट केले. तिचा बोलण्याचा रोख बाबर आझमच्या चाहत्यांकडे होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामच्या माध्यमातून ती व्यक्त झाली. बाबरने आपल्याला प्रपोज केला असल्याची केवळ अफवा पसरवली जात असल्याचे तिने म्हटले.

ती म्हणाली की, बाबर आझम आपल्या सर्वांचा भाऊ आहे. पण, त्याचे चाहते काहीही अफवा पसरवत आहेत. खरं तर सोशल मीडियावर एका चाहत्याने बाबरने लग्नाचा प्रस्ताव दिल्यास तू काय करशील असा अभिनेत्रीला प्रश्न केला होता. यावर तिने मी दिलगीरी व्यक्त करेन असे उत्तर दिले.

तसेच माझा कोणत्याही क्रिकेटपटूशी काहीही संबंध नाही. ते सर्व माझे भाऊ आहेत. मला कोणत्याही खेळाडूविषयी कोणताही आक्षेप नाही. फक्त ज्या अफवा पसरवल्या जात आहेत ते चुकीचे आहे, असेही तिने सांगितले.

दरम्यान, ही चर्चा तेव्हापासून सुरू झाली जेव्हा जहांगीरने सांगितले की, मी इंडस्ट्रीतील कोणाशीही लग्न करणार नाही. मग चाहत्यांनी तिचे नाव बाबरसोबत जोडण्यास सुरुवात केली.

पाकिस्तान क्रिकेटमधील एक मोठा चेहरा म्हणून बाबर आझमची ओळख आहे. शेजारील देशात बाबरची चांगलीच क्रेझ आहे.

जहांगीरने सांगितले होते की, मी इंडस्ट्रीतील कोणाशीही लग्न करणार नाही, हे अगदी स्पष्ट आहे. तो पाकिस्तानच्या बाहेरचा असेल तर आणखी बरे होईल. मी यावर कधीच विचार केला नाही, पण पर्याय दिल्यास मी लग्नानंतर परदेशात कुठेही स्थायिक होईन, मग अमेरिका, दुबई, कॅनडा किंवा अगदी लंडनमध्येही राहण्यास तयार आहे.