आईनेच केला विश्वासघात, सुपरस्टार पतीने दिला धोका; लेकींनीही सोडली साथ; अभिनेत्रीचं खडतर आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 02:38 PM2024-04-25T14:38:09+5:302024-04-25T14:53:22+5:30

वैयक्तिक आयुष्यातील वादळामुळे निळ्या डोळ्यांच्या या सुंदर अभिनेत्रीचं करिअरही संपलं.

मनोरंजनविश्वात कलाकारांचं आयुष्य फारच खडतर असतं. पडद्यावर पाहून त्यांचं आयुष्य खूपच हॅपनिंग वाटत असलं तरी अनेक कलाकार खऱ्या आयु्ष्यात दु:खी असतात. आर्थिक अडचणी, कुटुंबाची न मिळणारी साथ, घटस्फोट अशा अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं.

अशाच एका अभिनेत्रीची ही गोष्ट आहे जिने कुटुंबाला आर्थिक हातभार लावायचा म्हणून वयाच्या 5 व्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली. या कारणाने ती शाळेतही जाऊ शकली नाही. तिने फिल्मइंडस्ट्रीत खूप नाव कमावलं पण तिचं वैयक्तिक आयुष्य खडतरच राहिलं.

ही अभिनेत्री आहे सारिका ठाकुर (Sarika Thakur). दिल्लीत जन्माला आलेल्या सारिकाचे वडील लहानपणीच कुटुंबाला सोडून गेले. यामुळे सारिकावर जबाबदारी पडली. तिने बालकलाकार म्हणून वयाच्या 5 व्या वर्षापासूनच अभिनयाला सुरुवात केली.

अनेक वर्ष बालकलाकाराच्या भूमिकेत दिसल्यानंतर तिला 'गीत गाता चल' या सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून ब्रेक मिळाला. यामध्ये तिची जोडी सचिन पिळगांवकर यांच्यासोबत जमली. निळ्या डोळ्यांच्या या अभिनेत्रीवर प्रेक्षक फिदा झाले.

यानंतर तिने 'रजिया सुल्तान','बडे दिलवाले','नास्तिक','ऊंचाई' असे अनेक चित्रपट केले. ती टॉप अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये होती. सारिका सिनेमातून बरीच कमाई करत होती तर तिचा हिशोब तिची आई ठेवायची.

याचदरम्यान तिला समजलं की तिच्या आईने पैशांमधून पाच फ्लॅट खरेदी केले आणि यातील एकही फ्लॅट तिच्या नावावर नव्हता. आईने विश्वासघात केल्यानंतर सारिकाने घर सोडलं.

काही वर्षांनी तिची ओळख सुपरस्टार कमल हसन यांच्याशी झाली. दोघंही प्रेमात पडले. तेव्हा कमल हसन विवाहित होते. पत्नीसोबत त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु झाली तेव्हापासून ते सारिकासोबत लिव्हइनमध्ये राहू लागले.

सारिकाने लग्नाआधीच श्रुती आणि अक्षरा दोन मुलींना जन्म दिला. नंतर 1988 साली कमल हसन यांच्यासोबत त्यांनी लग्न केलं. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असतानाच ती लग्नानंतर चेन्नईला शिफ्ट झाली.

मात्र कमल हसन यांनी लग्नानंतर सारिका यांना धोका देत विवाहबाह्य संबंध ठेवले. त्यांचं अभिनेत्री सिम्रनसोबत अफेअर सुरु झालं. हे कळताच सारिका कोसळल्या. त्यांनी इमारतीवरुन उडी मारली. यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांनी कमल हसन यांच्यासोबत राहण्यास नकार दिला. 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर त्यांच्याकडे पैसेही नव्हते. अंघोळ आणि जेवणासाठी त्या मित्रांच्या घरी जायच्या आणि आपल्या कारमध्येच झोपायच्या.

इतकंच नाही तर त्यांच्या दोन्ही मुलींनीही आईला साथ दिली नाही. उलट वडिलांजवळ राहायचं असं त्या म्हणाल्या. त्यामुळे सारिका मुंबईला निघून आल्या. मुंबईत आईने घेतलेल्या पाच फ्लॅटपैकी एखादा फ्लॅट आपण आपल्या नावावर करु शकतो असं त्यांना वाटलं. मात्र हेही घडलं नाही. ते सर्व फ्लॅट आईने नोकरांच्या नावावर केले होते.

इतकंच नाही तर त्यांच्या दोन्ही मुलींनीही आईला साथ दिली नाही. उलट वडिलांजवळ राहायचं असं त्या म्हणाल्या. त्यामुळे सारिका मुंबईला निघून आल्या. मुंबईत आईने घेतलेल्या पाच फ्लॅटपैकी एखादा फ्लॅट आपण आपल्या नावावर करु शकतो असं त्यांना वाटलं. मात्र हेही घडलं नाही. ते सर्व फ्लॅट आईने नोकरांच्या नावावर केले होते.