"काकांनी स्थळ सुचवलं, आम्ही फोनवर बोललो अन्...", ९ वर्षांनंतर मृणाल दुसानिसच्या लग्नाची गोष्ट आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 05:36 PM2024-04-24T17:36:12+5:302024-04-24T17:45:17+5:30

Mrunal Dusanis : तब्बल ४ वर्षांनंतर मृणाल दुसानिस भारतात परतली आहे.

माझिया प्रियाला प्रित कळेना, हे मन बावरे, तू तिथे मी मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानिस घराघरात पोहचली. ती लग्नानंतर थेट परदेशातच स्थायिक झाली.

आता ती तब्बल ४ वर्षांनंतर भारतात परतली आहे. तिने सहकुटुंब सेल्फी पोस्ट करत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली. ती परत आल्याने तिचे चाहते आनंदित आहेत.

मृणालने २०१६ साली नीरजसोबत लग्नगाठ बांधली. तिने आतापर्यंत कधीच तिचे लग्न कसे जमले हे सांगितले नव्हते. मात्र सेलिब्रेटी कट्टाला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले आहे.

मृणाल म्हणाली की, आमचे अरेंज मॅरेज झाले आहे. बाबांच्या ओळखीच्या एका काकांनी आम्हाला नीरजचे स्थळ सुचवले होते. त्यानंतर मला एकदा त्याचा फोन आला. फोटो पाठवले. आमचे एकमेकांशी बोलणे झाले आणि आम्ही भेटायचे ठरविले

आई-बाबांनी स्थळ सुचवलं आहे म्हटल्यावर ते चांगलेच असणार याची मला खात्री होती. त्यामुळे लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आमच्या दोघांचे बोलणे झाल्यावर तो अमेरिकेतून इथे आला. आम्ही कुठे बाहेरही गेलो नाही. घरातच ३-४ मिनिटे आम्ही गप्पा मारल्या. त्यानंतर आम्ही दोघेही ६ महिने फोनवर एकमेकांशी बोलत होतो, असेही मृणालने सांगितले.

हा मुलगा चांगला आहे, तेव्हा मी ठरवले होते. एकंदर मला तो आवडला होता. त्यानंतर मी एका कार्यक्रमासाठी परदेशी गेले होते. त्यावेळी नीरज मला भेटायला आला होता. तेव्हा आमचे लग्न आधीच ठरलेले होते. अशारितीने साध्या सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी जुळून आल्या, असे मृणाल दुसानिस म्हणाली.

मृणाल दुसानिस आणि नीरज मोरेला एक मुलगी असून त्यांचा फॅमिली फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात.