हिरामंडीतील 'ही अभिनेत्री ठरली सर्वांच्या वरचढ; दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकत घेतलं सर्वाधिक मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 01:57 PM2024-04-24T13:57:59+5:302024-04-24T14:03:46+5:30

Heeramandi: हिरामंडीसाठी सर्वाधिक कमी मानधन शर्मिन सहगल हिला मिळालं आहे. संजय लीला भन्साळी शर्मिनचे काका असून त्यांनी तिला किरकोळ मानधन दिलं आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी या वेबसीरिजची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. मल्टीस्टारर असलेली ही सीरिज येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पाकिस्तानच्या शाही परिसर हिरामंडीवर आधारित या वेबसीरिजमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये अनेक लोकप्रिय कलाकार झळकले असून कोणी किती मानधन घेतलं ते जाणून घेऊयात.

अदिती राव हैदरी - अदितीने हिरामंडीपूर्वी संजय लीला भन्साळींसोबत पद्मावत या सिनेमात काम केलं होतं. यावेळी तिला हिरामंडीसाठी भन्साळींनी १.५ कोटी रुपये मानधन दिलं आहे.

मनिषा कोईराला- मनिषा कोईरालाने आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. यावेळी ती संजय लीला भन्साळींच्या वेबसीरिजमध्ये काम करणार आहे. या सीरिजसाठी तिने १ कोटी रुपये फी घेतली आहे.

फरदीन खान- हिरामंडीच्या निमित्ताने फरदीन खान बऱ्याच वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सीरिजसाठी त्याने ७५ लाख रुपये मानधन घेतलं आहे.

रिचा चड्ढा- रिचा या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. रिचानेदेखील मनिषा कोईरालाप्रमाणेच १ कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

संजिदा शेख- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री संजिदा खान हिरामंडीमधील एक महत्त्वाचा भाग आहे यासाठी तिने ४० लाख रुपये घेतले आहेत.

सोनाक्षी सिन्हा- हिरामंडीमध्ये सोनाक्षी महत्त्वूपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या सीरिजसाठी तिने तब्बल २ कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे. या सीरिजमध्ये ती फरीदान ही भूमिका साकारत आहे.

शर्मिन सहगल - हिरामंडीसाठी सर्वाधिक कमी मानधन शर्मिन सहगल हिला मिळालं आहे. संजय लीला भन्साळी शर्मिनचे काका असून त्यांनी तिला या सीरिजसाठी ३५ लाख रुपये मानधन दिलं आहे.