T20 World Cup 2024साठी 'या' 5 IPL स्टार्सच्या नावांची चर्चा, Team Indiaमध्ये होऊ शकते 'सरप्राईज एन्ट्री'!

T20 World Cup 2024, Team India Squad: सध्या काही नवखे अनकॅप्ड खेळाडू आपली चमक दाखवताना दिसत आहेत.गोलंदाजांवर आहेत.

Team India Squad: IPL 2024 मध्ये सध्या भारतीय खेळाडूंचा बोलबाला आहे. विशेषत: काही नवखे अनकॅप्ड खेळाडू आपली चमक दाखवताना दिसत आहेत. BCCI लवकरच जूनमध्ये होणाऱ्या T20 World Cup 2024 साठी संघ निवडणार आहे. यात सर्वांच्या नजरा या 5 युवा वेगवान गोलंदाजांवर आहेत.

T20 वर्ल्ड कपसाठी मोहसीन खान भारतीय संघात स्थान मिळवू शकतो. लखनौ सुपरजायंट्सकडून खेळताना त्याने यंदा 5 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 10च्या खाली आहे. तसेच, तो गोलंदाजीत वैविध्य दाखवत असतो.

लखनौ सुपरजायंट्सचा यश ठाकूरदेखील यंदा चांगली कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत 7 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. एका डावात त्याने ५ बळीही घेतले आहेत.

यंदा आपल्या वेगाने सर्वांना चकित करणारा मयंक यादवही सरप्राईज एंट्रीच्या शर्यतीत आहे. दुखापतीमुळे त्याला यंदा केवळ 3 सामने खेळता आले. त्यात त्याने 6 विकेट्स घेतल्या आहेत. फिटनेसच्या मुद्द्यावर त्याला नशीबाची साथ मिळाली तर त्याची वर्णी लागू शकते.

T20 विश्वचषकात सरप्राईज एंट्रीच्या शर्यतीत KKRचा हर्षित राणाही सज्ज आहे. त्याने यंदा KKR कडून 6 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत आणि त्याचा इकॉनॉमी रेटही 10 पेक्षा कमी आहे.

CSKचा तुषार देशपांडेदेखील या स्थानासाठी दावा सांगू शकतो. तुषारला यंदा 8 सामन्यात केवळ 6 विकेट मिळवता आल्या आहेत. पण त्याने अत्यंत कंजुष गोलंदाजी केली असून कमी धावा दिल्या आहेत.