महाराष्ट्र पोलिसांचा मंत्र, कुठल्याच माध्यमातून होऊ नका 'फूल'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 12:03 PM2021-04-01T12:03:22+5:302021-04-01T12:16:00+5:30

सध्या देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असल्याने एप्रिल फूलचा आधार घेऊन पोलिसांनी अफवा न पसरविणाऱ्या बातम्या किंवा मेसेजेस शेअर न करण्याचे बजावले आहे.

1 एप्रिल हा देशभरात एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो, म्हणजेच आपल्या मित्रांना, नातेवाईकांना उल्लू बनविण्याचा हा दिवस असतो.

सध्या देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असल्याने पोलिसांनी अफवा न पसरविणाऱ्या बातम्या किंवा मेसेजेस शेअर न करण्याचे बजावले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणालाही एप्रिल फूल बनविताना, कोरोनाबद्दल अफवा पसरणार नाहीत, याची काळजी घेण्याचं आवाहन केलंय.

कोरोना महामारीसोबतच फेस मेसेज आणि लालच दाखवून आर्थिक फसवणूक होणाऱ्या संदेशाचीही पडताळणी करण्याचं महाराष्ट्र पोलिसांनी सूचवलंय.

व्हॉट्सऍप, एसएमएस, इमेल, बॅनर, किंवा कुठल्याही माध्यमातून याप्रकारचे संदेश बघुन ‘फूल' होऊ नका. प्रत्येक संदेशाची सत्यता पडताळा!, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

सध्या फेककॉल आणि मेसेजच्या माध्यमातून नागरिकांना फसवणूक करण्यात येते, लिंक ओपन करायला लावून माहिती विचारली जाते.

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लसीकरणही जोरात सुरु आहे. मात्र, या लसीकरणासंदर्भात आणि लसीबाबत गैरसमज पसरविण्यात येत आहेत, ते खोटे आहेत.

हजार रुपये गुंतवा आणि लाख रुपये मिळवा, अशी प्रलोभनं दाखवूनही ग्राहकांची फसवणूक करण्यात येते.

महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात ट्विट करुन, फूल न बनण्याचं सूचवत जनजागृती केलीय.

Read in English