कमालच! भारतातील एकुलती एक व्यक्ती ज्याच्या घरापर्यंत जात होती रेल्वे, महालात बनवलं होतं प्रायव्हेट स्टेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 17:21 IST2026-05-18T16:52:32+5:302026-05-18T17:21:39+5:30

Train Interesting Facts : उत्तर प्रदेशच्या रामपुर संस्थानाचा नववा नवाब हामिद अली खान आपल्या लक्झरी जीवनासाठी प्रसिद्ध होता. त्याची राहणीमान लोकांसाठी एक आकर्षण होतं.

Train Interesting Facts : आपल्याला विश्वास बसणार नाही, पण भारतात एक अशी व्यक्ती होऊन गेली ज्याच्यासाठी रेल्वे थेट त्याच्या घरापर्यंत जात होती. इतकंच नाही तर त्याच्या महालातच एक रेल्वे स्टेशन बनवलं गेलं होतं.

उत्तर प्रदेशच्या रामपुर संस्थानाचा नववा नवाब हामिद अली खान आपल्या लक्झरी जीवनासाठी प्रसिद्ध होता. त्याची राहणीमान लोकांसाठी एक आकर्षण होतं.

त्यांच्या शाही जगण्याचा अंदाज यावरून लावू शकता की, त्यांच्या महालाच्या आतपर्यंत रेल्वे जात होती. ही सुविधा आजही एखाद्या स्वप्नासारखी वाटते.

नवाबाने आपल्या महालाच्या आतच एक खाजगी रेल्वे स्टेशन बनवलं होतं, ज्याची किंमत आज ११३ कोटी इतकी सांगितली जाते.

मिलक ते रामपुरपर्यंत जवळपास ४० किमी लांब रेल्वे लाइन बनवण्यात आली होती. जी थेट त्यांच्या महालाला थेट मुख्य रेल्वे लाइनसोबत जोडत होती.

१९२५ मध्ये त्यांनी एक खास शाही रेल्वे तयार केली होती. ज्याला 'द सलून' म्हटलं गेलं. ही रेल्वे एखाद्या महालापेक्षा कमी नव्हती. या रेल्वेत खास बेडरूम, मायनिंग रूम, मनोरंजन रूम, फारसी गालीचे आणि शानदार फर्नीचर अशा सुविधाही होत्या.

नवाब हामिद अली खान १९ जून १९३० साली वारले. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा नवाब रजा अली खानने संस्थान सांभाळलं. १९४७ च्या फाळणीदरम्यान नवाब रजा अली खानने आपल्या खाजगी रेल्वे अनेकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यास मदत केली.