रशियाच्या इशाऱ्यानंतरही अमेरिका ठाम, युक्रेनसाठी ४० अब्ज डॉलरच्या पॅकेजला मंजुरी देत केली बोलती बंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 12:47 PM2022-05-10T12:47:12+5:302022-05-10T12:58:29+5:30

अमेरिकेनं राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी युक्रेनला ४० अब्ज डॉलरची मदत करणाऱ्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी युक्रेनला ४० अब्ज डॉलरच्या आर्थिक मदतीच्या पॅकेजवर स्वाक्षरी करुन रशियाची बोलती बंद केली आहे.

अमेरिकेनं युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याविरोधात एक संयुक्त मोर्चा तयार करण्याची तयारी केली आहे. अमेरिकेच्या याच आर्थिक मदतीच्या कारणामुळे दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीला पराभूत करण्यासाठी मोठी मदत झाली होती. युक्रेनला दिल्या जाणाऱ्या या आर्थिक मदतीला अमेरिकेच्या रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अनुमोदन दिलं आहे.

अमेरिकी काँग्रेसनं रशियाविरोधात युद्ध लढण्यासाठी युक्रेनला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. अमेरिकेकडून युक्रेनला ४ अब्ज डॉलरची आर्थिक मदत, सैन्य आणि मानवीय सहाय्यता उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

अमेरिकेचं हे पाऊल म्हणजे रशियानं विजय दिनी केलेल्या परेडला दिलेलं जशात तसं उत्तर मानलं जात आहे.

९ मे १९४५ रोजी जर्मनीनं कोणत्याही अटीशर्थीविना आत्मसमर्पण केलं होतं. बायडन यांनी यावेळी युक्रेनच्या आर्थिक सहय्यता निधीवर स्वाक्षरी केल्यानंतर म्हटलं की,"युद्धाच्या मैदानात युक्रेनला यश मिळण्यासाठी हे आर्थिक सहाय्य अतिशय महत्वाचं ठरणार आहे. युद्धात युक्रेनला पाठविण्यात येणारी सैन्य आणि शस्त्रास्त्रांची मदत कोणत्याही अडथळ्याविना पुढील १० दिवसांत मंजुरी दिली गेली पाहिजे"

रशियन सैन्य युक्रेनमध्ये अत्याचार आणि मोठा गुन्हा करत असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. रशियामुळे आज युक्रेनमधील सर्वसामान्य जनतेला संकट आणि अनावश्यक विनाशाचा सामना करावा लागत आहे.

व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत म्हटलं की अमेरिका सध्याच्या महत्वपूर्ण क्षणी युक्रेनला सुरक्षा, आर्थिक आणि मानवीय सहाय्यताच्या संदर्भात समर्थन करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल.

अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी लेंड-लीज अॅक्टवर स्वाक्षरी केली असून युक्रेनला शस्त्रास्त्र आणि युद्ध साहित्य पुरवण्यासाठी आवश्यक अशी मंजुरी यातून मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत युक्रेनला अमेरिकेकडून मोठं पाठबळ मिळणार आहे.