Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 04:07 PM2024-05-20T16:07:52+5:302024-05-20T16:08:14+5:30

पिकअप व्हॅन खोल खड्ड्यात पडल्याने भीषण अपघात झाला.

Chhattisgarh 17 people died after a pick-up vehicle overturned near the Kawardha area, read here details | Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले

Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले

Chhattisgarh Road Accidentछत्तीसगडमधील कवार्धा येथे झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत १७ जणांना जीव गमवावा लागला आहे. पिकअप व्हॅन खोल खड्ड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच गाडीमध्ये २५ ते ३० जण होते असेही कळते. कवार्धाचे एसपी अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, कवार्धा परिसरात पिकअप वाहन उलटल्याने मोठा अपघात झाला. यात आठ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले की, कवार्धा येथे मजुरांनी भरलेले पिकअप वाहन पलटी झाल्याने काहींचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. यामध्ये ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्व कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी कामना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत पुरवत आहे. संबंधित वाहन कामगारांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. सर्व मजूर आपले काम उरकून परतत असताना त्यांचे वाहन एका खोल खड्ड्यात पडले. 

या भीषण रस्ता अपघाताने नागरिकांमध्ये एकच खळबळ माजली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेले पोलीस पथक आणि स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना कवार्धा येथील कुकडूर पोलीस स्टेशन परिसरातील बहपनी गावाजवळ घडली. वाहनात असलेले मजूर त्यांचे काम उरकल्यानंतर घरी परतत होते. घरी परतत असताना पिकअप वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी २० फूट खड्ड्यात पलटी झाली.

Web Title: Chhattisgarh 17 people died after a pick-up vehicle overturned near the Kawardha area, read here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.