'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 12:13 PM2024-05-21T12:13:52+5:302024-05-21T12:15:50+5:30

राहुल गांधी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, "बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने, तुमच्या आकांक्षा, माझ्या जबाबदाऱ्या. तुमच्या आठवणी, आज आणि नेहमी माझ्या हृदयात आहेत.

Rahul Gandhi gets emotional on Rajiv Gandhi's death anniversary shares old photo | 'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर

'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे.  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर वडिल राजीव गांधी  यांच्यासोबत बालपणीचा फोटो शेअर करत भावनिक संदेश लिहिला आहे. . 

राहुल गांधी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, "बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने, तुमच्या आकांक्षा, माझ्या जबाबदाऱ्या. तुमच्या आठवणी, आज आणि नेहमी माझ्या हृदयात आहेत.

"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. भारताला एक मजबूत आणि शक्तिशाली राष्ट्र बनवण्यात त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल लिहिले आहे.

पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी जी यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली."

१९९१ मध्ये राजीव गांधींची झाली होती हत्या

राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदूर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान आत्मघातकी हल्ल्यात हत्या झाली. मानवी बॉम्ब असल्याचे भासवून तेथे आलेल्या एका महिलेने त्यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. कमरेला बॉम्ब बांधून ती महिला राजीव गांधी यांच्याकडे गेली होती. त्या महिलेने त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकून बॉम्बचा ट्रिगर तिच्या दाबला. त्यानंतर झालेल्या स्फोटात राजीव गांधींसह १८ जणांचा मृत्यू झाला होता.

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर व्ही.पी. सिंग सरकारने २१ मे हा दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिवशी सर्व सरकारी कार्यालये आणि इतर सार्वजनिक संस्थांकडून दहशतवादाचा नायनाट करण्याची शपथ घेतली जाते. 

भारताचे सहावे पंतप्रधान राजीव गांधी त्यांच्या आई आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर वयाच्या ४० व्या वर्षी देशाचे पंतप्रधान झाले. आपल्या कार्यकाळात त्यांनी असे अनेक निर्णय घेतले आहेत, जे अत्यंत महत्त्वाचे आणि दूरगामी ठरले आहेत.

त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाचे निर्णय 

राजीव गांधी यांनी १९८६ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत देशातील शिक्षणाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना केली. 
त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार केला. देशात संगणकाच्या वापराला चालना दिली. सुपर कॉम्प्युटरच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले.
तसेच देशाची अर्थव्यवस्था उदार करण्याचा प्रयत्न केला. 
औद्योगिक उत्पादन वाढवण्यासाठी अनेक कॉर्पोरेट कंपन्यांना सबसिडी देण्यात आली.

Web Title: Rahul Gandhi gets emotional on Rajiv Gandhi's death anniversary shares old photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.