इतकी सुंदर की जणू अप्सरा भासावी! अदिती राव हैदरीच्या फोटोंवरुन हटता हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 04:25 PM2024-05-20T16:25:49+5:302024-05-20T16:34:31+5:30

आदिती राव हैदरी ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांच्या सौंदर्य आणि एलिगेंससमोर कोणी टिकू शकत नाही.

आदितीच्या सौंदर्याचे आजही कित्येक चाहते आहेत. तिच्या सौंदर्याला चार चांद तेव्हा लागतात जेव्हा ती नटून थटून एखादा लुक कॅरी करते.

अलिकडेच आदिती राव हैदरी हिने 'हीरामंडी' सीरिजमध्ये 'बिब्बोजान' ही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीची भूमिका आवडली.

'हीरामंडी' सीरिजमधील काही खास फोटो आदितीनं चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'हम सोने के पिंजरों में फड़फड़ाते हैं और ख्वाब आजादी के देखते हैं'.

'बिब्बोजान' लूकमध्ये आदिती हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. आदिती इतकी सुंदर दिसतेय की तिच्यावरून नजर हटवणे कठीणच.

सध्या आदितीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

आदितीच्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

तिचा सोज्वळ चेहेरा आणि निरागस डोळे यांचं प्रचंड कौतुक होतयं. चाहते देखील अभिनेत्रीचे फोटो पाहून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

आदिती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.