HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली

By प्रशांत बिडवे | Published: May 21, 2024 11:26 AM2024-05-21T11:26:17+5:302024-05-21T11:27:37+5:30

यंदा परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत...

HSC Result 2024 Maharashtra Board: 93 dot 37 percent pass in 12th, highest pass in 'Kokan' | HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली

HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली

Maharashtra HSC Result| पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल मंगळवारी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केला. (12th result maharashtra board)

यंदा परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीचा निकाल ९३.३७ टक्के एवढा लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी २.१२ टक्क्यांनी जास्त आहे. गतवर्षी २०२३ चा निकाल ९१.३५ टक्के एवढा लागला होता.

बारावी परीक्षेचे दि.२१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत आयोजन केले होते. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. 

कोकण विभागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. कोकण विभागचा निकाल ९७.५१ टक्के एवढा आहे तर सर्वाधिक कमी निकाल मुंबई ९१.९५ एवढा लागला आहे.

निकालात पुणे विभाग तिसऱ्या स्थानी - 
 पुणे विभागात ९४.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  कोल्हापूर (९४.२४), छत्रपती संभाजीनगर (९४.०४), अमरावती (९३), लातूर (९२.३६), नागपूर (९२.१२)

छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळालातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनीने १०० टक्के गुण घेतले आहेत. तिला परीक्षेत ५८२ तर क्रीडा विषयात १८ गुण मिळाले.

Read in English

Web Title: HSC Result 2024 Maharashtra Board: 93 dot 37 percent pass in 12th, highest pass in 'Kokan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.