हिरवी साडी, कपाळाला टिकली अन्...; वनिता खरातचं फोटोशूट, नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 10:38 AM2024-05-21T10:38:23+5:302024-05-21T10:41:30+5:30

वनिता खरातंच नवं फोटोशूट, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

वनिता खरात ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.

वनिता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही वनिता चाहत्यांना देत असते.

नुकतंच वनिताने खास फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत.

वनिताने इन्स्टाग्रामवरुन तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. हातात बांगड्या, कपाळाला गोल लाल टिकली असा साधा लूक तिने केला आहे.

वनिताचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

वनिताच्या नवऱ्यानेही तिच्या फोटोंवर "छोटा बाबू" अशी कमेंट केली आहे.

हास्यजत्रेबरोबरच वनिता अनेक मालिकांमध्येही झळकली आहे. शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग' सिनेमातील तिच्या छोट्याशा भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.