Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'

Mothers Day Special : आज सर्वत्र जागतिक मातृ दिन साजरा केला जात आहे.

आज सर्वत्र जागतिक मातृ दिन साजरा केला जात आहे. अनेकजण या पार्श्वभूमीवर आपल्या आईचा फोटो तसेच तिच्या आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहेत. आज आपण भारतीय क्रिकेटला स्टार खेळाडूंची फौज देणाऱ्या माऊलींविषयी जाणून घेणार आहोत.

महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आईचे नाव रजिनी तेंडुलकर असे आहे. सचिनने मागील मातृदिनी तिच्यासोबतचा फोटो शेअर केला होता.

भारताचा मिस्टर ३६० अर्थात सूर्यकुमार यादवच्या आईचे नाव स्वपना यादव आहे. सूर्याने आईसोबतचा फोटो शेअर केला आहे.

मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू तिलक वर्मा त्याच्या खेळीने सर्वांना प्रभावित करत आहे. त्यांच्या आईचे नाव गायत्री देवी असे आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची आई पूर्णिमा शर्मा. त्या मूळच्या आंध्रप्रदेशच्या रहिवासी आहे.

भारतीय क्रिकेटमधील पांड्या बंधूंच्या आईचे नाव नलिनी पांड्या असे आहे. या फोटोत पांड्या बंधूंसह त्यांच्या पत्नी देखील दिसत आहेत.

माजी खेळाडू सुरेश रैनाच्या आईचे नाव प्रवेश रैना आहे. रैनाने मागील वर्षी आईसोबतचा फोटो शेअर केला होता.

विराट कोहली नेहमी त्याच्या आईसोबतचे फोटो शेअर करत असतो. त्याच्या आईचे नाव सरोज कोहली आहे.

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या आईचे नाव दलजीत बुमराह आहे.