Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 07:43 PM2024-05-20T19:43:40+5:302024-05-20T20:13:06+5:30

Narendra Modi And Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Narendra Modi Slams Rahul Gandhi old video for communal approach openly promoting muslim reservation | Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात

Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या एका जुन्या व्हिडिओचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, "राजपुत्र स्वतः म्हणत आहेत की, मुस्लिमांना आरक्षण दिलं पाहिजे. आज मी सोशल मीडियावर काँग्रेस राजपुत्राचा एक व्हिडीओ पाहिला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. मी सर्वांना सांगतो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मी हे विशेषत: मीडियाच्या लोकांना सांगतो."

"हा व्हिडीओ 11-12 वर्षे जुना आहे. काँग्रेसच्या राजपुत्राचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे राजपुत्र उघडपणे सांगत आहेत की, काँग्रेस पक्ष मुस्लिमांना आरक्षण देणार आहे." राहुल गांधींचा हा जुना व्हिडीओ अचानक सोशल मीडियावर आला. या जुन्या व्हिडिओमध्ये राहुल समाजवादी पक्षावर निशाणा साधत आहेत आणि म्हणत आहेत, "आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. मुलायमसिंह यादव तीन वेळा मुख्यमंत्री झाले."

"आरक्षणावर एकदाही बोलले नाहीत. पत्रकारांनी त्यांना आरक्षणाबाबत काय मत विचारले. तेव्हा जणू काही शांतता होती." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्या अनेक भाषणांमध्ये मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या काँग्रेसच्या धोरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. 
 

Web Title: Narendra Modi Slams Rahul Gandhi old video for communal approach openly promoting muslim reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.