ब्रेक अप के बाद! नेयमारचं रोमान्स जोरात, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या EX GF सोबत लिपलॉप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 04:18 PM2023-02-06T16:18:04+5:302023-02-06T16:20:45+5:30

पॅरीस सेंट-जर्मेन क्लबचा सुपरस्टार नेयमार याने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. बर्थ डे पार्टिला एक्स गर्लफ्रेंड ब्रुना बिआंसार्डी आली अन्...

पॅरीस सेंट-जर्मेन क्लबचा सुपरस्टार नेयमार याने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. बर्थ डे पार्टिला एक्स गर्लफ्रेंड ब्रुना बिआंसार्डी आली अन्...

ब्राझिलीयन स्टार खेळाडू नेयमारने मागच्या वर्षी ब्रुनासोबत ब्रेक अप केले होते आणि ३१व्या बर्थ डे पार्टिला ती आली.

ब्रुनाला पाहता नेयमारला जुनं प्रेम आठवलं अन् त्याने तिच्यासोबत कॅमेरासमोर लिपलॉप केलं, ब्रुनानेही हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

नेयमारनेही त्याच्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून अजूनही ब्रुनाच्या प्रेमात असल्याचे जाहीर केले.

साओ पाऊलोची मॉडेल असलेल्या ब्रुनाचे सोशल मीडियावर २२ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि नेयमारसोबत तिला पुन्हा पाहून फॅन्सनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

२०२१ मध्ये नेयमार व ब्रुना यांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली, परंतु काही महिने त्यांनी त्यांचं नातं लपवून ठेवले

जानेवारी २०२२ मध्ये त्यांनी नातं जाहीर केलं, परंतु काही महिन्यांतच त्यांनी हे नातं तोडलं. २७ वर्षीय नेयमारवर तिने फसवल्याचे आरोपही केले होते.