वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 12:52 IST2026-05-15T12:51:03+5:302026-05-15T12:52:13+5:30

वास्तू शास्त्र: वास्तू शास्त्रात स्वयंपाक घराशी संबंधित अनेक साधे सोपे नियम सांगितले आहेत, त्यानुसार बदल केले असता होईल मोठा लाभ.

Vastu Tips: Why you should never empty the flour container completely? Fix these kitchen mistakes today | वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा

वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा

वास्तू शास्त्रानुसार, आपले स्वयंपाकघर हे केवळ अन्न शिजवण्याचे ठिकाण नसून ते घरातील सकारात्मक ऊर्जेचे केंद्र आहे. येथील वस्तू तुमच्या आर्थिक अडचणी दूर करून तुम्हाला श्रीमंत बनवण्यासही मदत करू शकतात. सदर लेखात आपण पोळी/चपातीसाठी लागणारे पीठ आणि त्याचा वास्तू शास्त्राशी संबंध जाणून घेऊ. 

हे ही वाचा : शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!

आपल्या संस्कृतीत अन्नाला 'पूर्णब्रह्म' मानले जाते. पिठाचा संबंध हा थेट आपल्या अन्नाशी आणि पर्यायाने आपल्या समृद्धीशी असतो. छोटीशी वाटणारी ही गोष्ट तुमच्या  घडवू शकते. पिठाच्या डब्याबाबत पाळलेले काही साधे नियम तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात, कसा ते जाणून घेऊ. 

१. पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा करू नका

वास्तू शास्त्रानुसार, पिठाचा डबा कधीही पूर्णपणे रिकामा होऊ देऊ नका. डब्यात थोडे तरी पीठ शिल्लक असतानाच नवीन पीठ भरा.

परिणाम: पिठाचा डबा पूर्ण रिकामा होणे हे घरातील अन्नाची कमतरता आणि आर्थिक तूट दर्शवते. डबा नेहमी भरलेला राहिल्याने घरात बरकत राहते.

२. पिठामध्ये 'या' गोष्टी ठेवा

जर तुम्हाला सतत पैशांची चणचण भासत असेल, तर पिठाच्या डब्यात काही विशिष्ट वस्तू ठेवल्याने शुभ फळ मिळते:

तुळशीची पाने: पिठाच्या डब्यात सुकलेली तुळशीची ३-४ पाने ठेवा. यामुळे घरातील अन्न शुद्ध राहते आणि घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते.

केशर किंवा हळद: पिठाच्या डब्यात थोडी हळद किंवा केशराच्या काड्या टाकल्याने गुरु ग्रह बलवान होतो, ज्यामुळे मान-सन्मान आणि पैसा वाढतो.

हे ही वाचा : शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?

३. पिठाचा डबा स्वच्छ ठेवा

अनेकदा आपण जुन्या पिठावरच नवीन पीठ ओततो. पण, महिना-दोन महिन्यातून एकदा डबा पूर्ण स्वच्छ करून, उन्हात वाळवून मगच त्यात नवीन पीठ भरावे.

महत्त्व: स्वच्छतेमुळे राहू आणि शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि अन्नामध्ये सात्त्विकता टिकून राहते.

पिठाशी संबंधित इतर महत्त्वाचे नियम

शिळी कणीक टाळा: चुकूनही उरलेली किंवा मळलेली कणीक फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवू नका. शास्त्रानुसार, शिळ्या कणकेचे गोळे 'पिंडा'चे स्वरूप घेतात, ज्यामुळे घरात नकारात्मकता आणि आजारपण येते.

पीठ झाकून ठेवा : भिजवून ठेवलेली कणिक कधीही उघडी ठेवू नका, त्यावर ओला सुती रुमाल टाका किंवा एखाद्या डब्याने ती झाकून ठेवा. 

राजयोग : पिठाच्या डब्यात हळकुंड ठेवल्यास राजयोग तयार होतो आणि घरात अन्न धान्याची उणीव भासत नाही. 

हे ही वाचा : Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!

केवळ पिठावर अवलंबून न राहता, स्वयंपाकघरातील 'मिठाच्या' (Salt) बरणीबाबतही जागरुक राहा. मिठाची बरणी नेहमी काचेची असावी आणि ती कधीही उघडी ठेवू नका. मीठ हे चंद्राचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे घरातील मानसिक शांतता टिकून राहते. 

Web Title : वास्तु टिप्स: आटे का डिब्बा कभी खाली न करें; रसोई की ये गलतियाँ सुधारें!

Web Summary : वास्तु शास्त्र आटे के डिब्बे को समृद्धि से जोड़ता है। इसे कभी भी पूरी तरह खाली न करें। सौभाग्य और स्वास्थ्य के लिए हल्दी या तुलसी डालें। सकारात्मकता और धन बनाए रखने के लिए इसे साफ रखें और बचे हुए आटे को स्टोर करने से बचें।

Web Title : Vastu Tips: Never Empty Flour Container; Correct Kitchen Mistakes Today!

Web Summary : Vastu Shastra links flour containers to prosperity. Never fully empty it. Add turmeric or tulsi for good fortune and health. Keep it clean and avoid storing leftover dough to maintain positivity and wealth.