मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 14:56 IST2026-05-15T14:52:49+5:302026-05-15T14:56:36+5:30

एएम इंटेलिजन्स लॅब्ससोबत मुंबई, दिल्लीत झाल्या बैठका

500 MW capacity 'Green AI Compute Hub' in Mumbai Metropolitan Region Investment of Rs 1.14 lakh crore | मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक

मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक

मुंबई महानगर क्षेत्रात ५०० मेगावॅट MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब' आणि डेटा सेंटर पार्क निर्मितीसाठी एएम इंटेलिजन्स लॅब्ससोबत १.१४ लाख कोटींचा करार झाला असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. या करारामागे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याचे यश असल्याचेही ते म्हणाले. एक्सवरील पोस्टमध्ये मंत्री सामंत यांनी खासदार डॉ. शिंदे यांचे आभार मानले.

उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञानाचा आणि 'इंटेलिजन्स'चा प्रभावी वापर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही एमएमआर क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले. खासदार डॉ. शिंदे यांच्या विशेष निमंत्रणावरून एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाने १.१४ लाख कोटींचा (१२ अब्ज डॉलर्स) सामंजस्य करार केला. खासदार डॉ. शिंदे यांनी मुंबई आणि नवी दिल्लीत घेतलेल्या सातत्यपूर्ण बैठका व पाठपुराव्याचे हे यश आहे, असे मंत्री सामंत यांनी म्हटले आहे.

या गुंतवणूक करारामुळे मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब' आणि डेटा सेंटर पार्क उभारले जाणार आहे. यामुळे येथे २,००० ते ३,००० पेक्षा जास्त उच्च-तंत्रज्ञान रोजगारांची निर्मिती होईल. २४ तास नवीकरणीय ऊर्जेवर चालणारा हा देशातील अग्रगण्य प्रकल्प ठरेल, असा विश्वास मंत्री सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्राला देशाची 'डिजिटल आणि एआय राजधानी' बनवण्याच्या दिशेने उचललेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, असे ते म्हणाले.

Web Title : मुंबई में 500 मेगावाट का ग्रीन एआई कंप्यूट हब: ₹1.14 लाख करोड़ का निवेश

Web Summary : मुंबई महानगर क्षेत्र में 500 मेगावाट का ग्रीन एआई कंप्यूट हब और डेटा सेंटर पार्क बनेगा। एएम इंटेलिजेंस लैब्स ₹1.14 लाख करोड़ का निवेश करेगी। श्रीकांत शिंदे के प्रयासों से संचालित इस परियोजना का उद्देश्य 2,000-3,000 उच्च-तकनीकी नौकरियां पैदा करना और महाराष्ट्र को नवीकरणीय ऊर्जा द्वारा संचालित एक डिजिटल और एआई नेता के रूप में स्थापित करना है।

Web Title : Mumbai to get 500 MW Green AI Compute Hub: ₹1.14 Lakh Crore Investment

Web Summary : Mumbai Metropolitan Region will house a 500 MW Green AI Compute Hub and data center park. AM Intelligence Labs will invest ₹1.14 lakh crore. The project, driven by Shrikant Shinde's efforts, aims to create 2,000-3,000 high-tech jobs and establish Maharashtra as a digital and AI leader, powered by renewable energy.