Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 16:19 IST2026-05-15T16:18:05+5:302026-05-15T16:19:36+5:30

Adhik Maas 2026: १७ मे रोजी अधिक ज्येष्ठ मास सुरु होत आहे, त्याला पुरुषोत्तम मास किंवा मलमासही म्हणतात, पण धोंड्याचा मास म्हणण्यामागे काय कारण आहे ते जाणून घ्या

Adhik Maas 2026: What is the exact reason behind calling Adhik Maas 'Dhondyacha' Maas? | Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?

Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?

यंदा रविवार १७ मे रोजी अधिक ज्येष्ठ महिन्याला(Adhik Maas 2026) सुरुवात होत आहे. तर अधिक ज्येष्ठ महिन्याची सांगता १५ जून २०२६ रोजी होणार आहे. या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात आणि याच काळात तुमच्या जावयाच्या सवडीनुसार त्याचा मान केला जातो, भेटवस्तू दिल्या जातात, त्याचे अगत्य केले जाते, पण त्यामागचा हेतू काय ते जाणून घेऊ आणि या महिन्याला धोंड्याचा महिना का म्हणतात तेही जाणून घेऊ. 

हे ही वाचा : शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?

हिंदू संस्कृतीत, परंपरेत प्रत्येक नात्याला मानाने वागवले जाते. जेणेकरून आपसुकच परस्पर ऋणानुबंध दृढ होतात. अधिक मासानिमित्त असेच एक हळुवार नाते, ते म्हणजे सासु-सासरे आणि जावयाचे. आपल्या मुलीला सासरच्या वातावरणात प्रेमाने सांभाळून घेणारा जावई, हा मुलीच्या मातापित्यांना `नारायणा'समान भासतो. म्हणून पुरुषोत्तम मासात जावयाचा मान म्हणून त्याला वाण दिले जाते. 

जावयाला काय वाण द्यावे?

अधिक मासातील प्रत्येक दिवस शुभ असतो. तरीदेखील जावयाच्या सवडीने त्याला घरी बोलावून त्याचा साग्रसंगीत सत्कार केला जातो. अलीकडे, तर प्रत्येक गोष्ट थाटामाटात साजरी करण्याची प्रथा झाल्यामुळे जावयाला काय वाण द्यावे, याबाबत अनेक सोन्याच्या पेढ्यांमध्ये चढाओढ पहायला मिळते. चांदीचे ताम्हन, चांदीचे निरांजन, चांदीचा पेला अशा अनेक वस्तू भेट म्हणून देता येतात. अर्थात हा सगळा भाग, स्वेच्छेचा. हौसेला मोल नसते. परंतु, शास्त्रानुसार तीस तीन अनारसे, म्हैसूर पाक किंवा बत्तासे असे सच्छिद्र पदार्थांचे वाण देण्याची पद्धत आहे. 

हे ही वाचा : शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!

जोडवी बदलण्याचा मुहूर्त. 

अधिक मासाचे निमित्त, म्हणून सुवासिनींनादेखील जोडवी बदण्यास निमित्त मिळते. जोडवी हे सौभाग्यलेणे म्हणून पायात घातले जाते. जोडव्यांमध्येही अनेक सुंदर, नक्षीदार प्रकार मिळतात. दर तीन वर्षांनी अधिक मासाची आठवण म्हणून नवीन जोडवी घेतली जातात. 

धोंड्याचा मास आणि धोंड्याचा नैवेद्य.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी अधिक मासाला धोंड्याचा महिना असे म्हटले जाते. नियमित सुरू असलेल्याल्या कालगणनेत आडमुठ्यासारखा, मध्येच आलेल्या दगडासारखा (धोंड्यासारखा) आलेला महिना म्हणून धोंड्याचा महिना असेही एक मत आहे. मात्र, धोंडा आणि अधिक मास यांना जोडणारा एक खाद्यपदार्थ आहे, त्याला `धोंडा' म्हटले जाते. नागपंचमीला पुरण घालून चौकोनी पदार्थ केला जातो, त्याला `दिंड' म्हणतात, तोच पदार्थ मराठवाड्यात गोल लाडवासारखा किंवा धोंड्यासारखा वळून उकडवला जातो. त्याला धोंड्याचा नैवेद्य म्हणातात. जेवताना जावयाला आग्रहाने धोंडे खाऊ घातले जातात आणि त्याच्या रुपाने नारायणाने धोंड्यांचा नैवेद्य स्वीकार केला, असे समजतात.

हे ही वाचा : Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!

जावई हा जिव्हाळ्याचा, आधाराचा धागा खूप पूर्वीपासून जपण्यात आला आहे. प्रत्येक नाते शब्दातून सांगण्यापेक्षा प्रतीकांतून, उत्सवांच्या माध्यमातून आविष्कारित करण्याची सवय आपल्या हिंदू संस्कृतीने लावली आहे. काळ बदलला तशी सण-उत्सवांची पद्धत बदलली. वाण देण्याच्या वस्तूही बदलल्या...मात्र परंपरांची साखळी अतुट राहिल्याने नात्यांमधले अवघडलेपण हळू हळू दूर होऊ लागले. लक्ष्मी नारायण भगवान की जय।

Web Title : Adhik Maas 2026: क्यों कहलाता है 'धोंड्याचा' मास?

Web Summary : अधिक मास, जिसे धोंड्याचा महीना भी कहते हैं, में दामाद को उपहारों और उत्सवों से सम्मानित किया जाता है। यह परंपरा पारिवारिक बंधन को मजबूत करती है, जो संबंध और शुभ कार्यों के लिए एक समय प्रदान करती है।

Web Title : Adhik Maas 2026: Why is it called Dhondyacha Maas?

Web Summary : Adhik Maas, also known as Dhondyacha Mahina, honors the son-in-law with gifts and celebrations. This tradition strengthens family bonds, offering a time for connection and auspicious acts.