"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 15:56 IST2026-05-15T15:55:09+5:302026-05-15T15:56:32+5:30
इराणकडे अण्वस्त्रे असावीत असे चीनलाही वाटत नाही." तसेच, लष्करी सामर्थ्याचा दावा करताना ट्रम्प म्हणाले, जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष, जनरल डॅन केन यांनी त्यांना सांगितले की, अमेरिका इराणचे खर्ग बेट केवळ "चार ते पाच मिनिटांत" पूर्णपणे नष्ट करू शकते.

"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
अमेरिका-इराण यांच्यातील संघर्ष अद्यापही संपताना दिसत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा दिला आहे. आपल्या तीन दिवसीय चीन दोऱ्याच्या अखेरच्या दिवशी ‘फॉक्स न्यूज’ ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, इराणकडे आता केवळ एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे, 'तडजोड' अथवा 'विनाश'. इराण सध्या 'उद्ध्वस्त' झाला आहे. असून, त्यांना एकतर संघर्षावर पडदा टाकण्यासाठी तहाचा मार्ग स्वीकारावा लागेल किंवा संपूर्ण विनाशाला सामोरे जावे लागेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर, अमेरिका इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळवू देणार नाही, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
अमेरिका इराणचे खर्ग बेट केवळ "चार ते पाच मिनिटांत" पूर्णपणे नष्ट करू शकते -
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर ट्रम्प म्हणाले, "जिनपिंग यांनाही अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार झालेला पाहायचा आहे. चीनने यासाठी मदतीचे आश्वासनही दिले आहे. इराणकडे अण्वस्त्रे असावीत असे चीनलाही वाटत नाही." तसेच, लष्करी सामर्थ्याचा दावा करताना ट्रम्प म्हणाले, जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष, जनरल डॅन केन यांनी त्यांना सांगितले की, अमेरिका इराणचे खर्ग बेट केवळ "चार ते पाच मिनिटांत" पूर्णपणे नष्ट करू शकते.
चीनसोबत कोण कोणते करार? -
इराणला मिळणाऱ्या चिनी समर्थनासंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले, "आता चीन इराणला कोणतेही लष्करी साहित्य देणार नाही, असे आश्वासन जिनपिंग यांनी दिले आहे." सध्या चीन इराणकडून ९० टक्के तेले खरेदी करतो. मात्र, असे असेल तरीही ट्रम्प यांनी जिनपिंग यांच्याशी असलेल्या संबंधांचे कौतुक केले आहे.
अमेरिकेकडून २०० 'बोईंग' विमाने खरेदी करण्यासंदर्भात चीनने सहमती दर्शवली आहे -
ट्रम्प यांच्या या दौऱ्यात व्यापारावरही मोठा भर देण्यात आला. अमेरिकेकडून २०० 'बोईंग' विमाने खरेदी करण्यासंदर्भात चीनने सहमती दर्शवली आहे. मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादने घेण्याचेही मान्य केले आहे. तसेच, चिनी जहाजे आता टेक्सास, लुईझियाना आणि अलास्का येथून अमेरिकन तेल नेण्यास सुरुवात करतील, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
इराण मोहीम व्हिएतनाम, इराक युद्धापेक्षाही छोटी -
इराणविरुद्धच्या संभाव्य लष्करी कारवाईचे समर्थन करताना ट्रम्प म्हणाले, "ही मोहीम व्हिएतनाम किंवा इराक युद्धापेक्षा खूप छोटी असेल. इराणचे नौदल आणि हवाई सुरक्षा आता प्रभावी राहिलेली नाही, आम्ही ती एका दिवसात संपवू शकतो, असा दावाही ट्रम्प यांनी यावेळी केला. या दौऱ्यात एलन मस्क आणि टिम कुक यांच्यासह अनेक दिग्गज अमेरिकन सीईओ देखील ट्रम्प यांच्यासोबत आहेत.