PICS : सिद्धी पाटणे लवकरच होणार दलाल घराण्याची सून, लग्नाआधी केलं झक्कास प्री-वेडिंग फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 04:45 PM2021-10-24T16:45:49+5:302021-10-24T16:58:33+5:30

‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ या तुफान गाजलेल्या गाण्यातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सिद्धी पाटणे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ या तुफान गाजलेल्या गाण्यातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सिद्धी पाटणे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. लवकरच सिद्धी दलाल घराण्याची सून होणार आहे.

काही दिवसांपूर्वी सिद्धीने तिच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता सिद्धीने प्री-वेडिंग फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

प्री-वेडिंग फोटोशूट सध्या तुफान व्हायरल होत आहेत. सिद्धीच्या होणा-या नव-याचे नाव विशाल दलाल असून तो आर्किटेक्ट आहे.

‘गोव्याच्या किना-यावर’ या गाण्यातून सिद्धी पाटणे हिने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. सुहृद वर्डेकर आणि सिद्धी पाटणे यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते.

सिद्धी पाटणे ही मूळची खेड, रत्नागिरीची. इथेच तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे मुंबई युनिव्हर्सिटीमधून तिने एमबीएचे शिक्षण घेतले.

मालिका चित्रपटातून काम करत असताना तिला एका व्हिडीओ अल्बममध्ये झळकण्याची नामी संधी मिळाली.

सिद्धीने मालिका आणि चित्रपटातूनही काम केले आहे. प्रेमा तुझा रंग कसा, विठू माऊली, श्री गुरुदेवदत्त, सांग तू आहेस का अशा वेगवेगळ्या मालिकांमधून तिने अभिनय साकारला आहे.

श्री गुरुदेव दत्त या मालिकेत सिद्धीला पार्वतीची आव्हानात्मक भूमिका तिने साकारली होती. ‘ सांग तू आहेस का’ या स्टार प्रवाहवरील मालिकेतून ती शांभवीच्या भूमिकेत झळकली. शिवाय मधल्या काळात काही ज्वेलरीसाठी तिने मॉडेलिंग देखील केले आहे.